Todays Panchang : आज शनिवार...आजचा दिवस खूप खास आहे. आज पापमोचनी (#Ekadashi) एकादशी (Papmochani Ekadashi 2023) आहे. शिवाय आजच्या दिवशी शनीदेवाला प्रसन्न करण्यासाठी उत्तम आहे, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. कारण यादिवशी अद्भूत संयोग जुळून आला आहे. पंचागानुसार या दिवशी साडेसाती आणि साडेसाती त्रस्त असलेल्या लोकांनी फक्त काही उपाय केल्या शनीची (Shani Dev) साडेसाती देखील तुमच्यासाठी शुभ ठरु शकते. शनिवार धर्म-कर्माच्या दृष्टीकोनातून विशेष आहे. चला आजचा संपूर्ण दिवसाचं पंचागं जाणून घेऊयात. (18 march 2023 todays panchang mahurat papmochani ekadashi vrat shani dev puja latest astro news in marathi)
आजचा वार - शनिवार
तिथी- द्वादशी
नक्षत्र - श्रावण
योग - शिव
करण- बालव
सूर्योदय (Sun Rise): सकाळी 06:28:09 वाजता
सूर्यास्त (Sun Set): संध्याकाळी 18:31:00 वाजता
चंद्रोदय (Moon Rise): 19 मार्च सकाळी 4:57 वाजता
चंद्रास्त (Moon Set): पहाटे 2:58 वाजेपर्यंत
चंद्र रास(Moon Sign): मकर
ऋतु (Season): वसंत
दुष्टमुहूर्त (Dusht Muhurat) - 06:28:09 ते 07:16:21 वाजेपर्यंत
राहु काल (Rahu Kaal) - 09:28:52 ते 10:59:14 वाजेपर्यंत
अभिजीत मुहूर्त (Abhijit) : 12:05:29 पासून 12:53:41 वाजेपर्यंत
आजची दिशा शूला (Disha Shoola) : पूर्व
ताराबल - अश्विनी, कृत्तिका, रोहिणी, मृगशिरा, आर्द्रा, पुष्य, मघा, उत्तरा फाल्गुनी, हस्त, चित्रा, स्वाति, अनुराधा, मूल, उत्तराषाढ़ा, श्रवण, धनिष्ठा, शतभिषा, उत्तराभाद्रपद
चंद्रबल - मेष, कर्क, सिंह, वृश्चिक, मकर, मीन
ऊँ त्रयम्बकं यजामहे सुगंधिम पुष्टिवर्धनम ।
उर्वारुक मिव बन्धनान मृत्योर्मुक्षीय मा मृतात ।।
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)