Todays Panchang : आज मंगळवार आणि अमावस्या. उत्तर भारतामध्ये आजची अमावस्या वर्षातील पहिली भौमवती अमावस्या म्हणून ओळखली जाते. मंगळवारच्या तिथीवर येणाऱ्या अमावस्येला भौमवती अमावस्या म्हणतात. जिथं मारुतीरायाची पूजा केली जाते. सकाळच्या वेळी अंघोळ करून पूजाअर्चा करण्याला आजच्या दिवशी प्राधान्य दिलं जातं. ही अमावस्या अतिशय महत्त्वाची, कारण यामुळं घरात सुख- समृद्धी नांदते. कुटुंबावरील सर्व संकटं दूर होतात. इच्छा पूर्ण होतात.
मंगळवारी केलेल्या पूजेमुळं आयुष्यातील अनेक दु:ख दूर होतात. असं म्हणतात की मनीच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी 21 किंवा 25 मंगळवारचा उपवास करावा. त्यामुळं फलप्राप्ती होते. आठवड्यातला प्रत्येत दिवस खूप काही सांगतो, सूचित करतो. हासुद्धा असाच एक दिवस. हा दिवस तुम्हाला शुभ जावो. चला तर मग, दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहून घ्या आजचं पंचांग.... (21 march 2023 tuesday amavasya todays panchang mahurat astro news)
आजचा वार - मंगळवार
तिथी- अमावस्या
नक्षत्र - शतभिष
योग - शुभ
करण- चतुष्पाद, नागा
सूर्योदय - सकाळी 06:24 वाजता
सूर्यास्त - संध्याकाळी 06.32 वाजता
चंद्रोदय - चंद्रोदय नाही
चंद्रास्त - सकाळी 18:15 वाजता
चंद्र रास- कुंभ
दुष्टमुहूर्त– 08:50:17 पासुन 09:38:49 पर्यंत
कुलिक– 13:41:30 पासुन 14:30:02 पर्यंत
कंटक– 07:13:13 पासुन 08:01:45 पर्यंत
राहु काळ– 15:30:43 पासुन 17:01:43 पर्यंत
कालवेला/अर्द्धयाम– 08:50:17 पासुन 09:38:49 पर्यंत
यमघण्ट–10:27:22 पासुन 11:15:54 पर्यंत
यमगण्ड– 09:26:41 पासुन 10:57:42 पर्यंत
गुलिक काळ– 12:28:42 पासुन 13:59:42 पर्यंत
अभिजीत मुहूर्त - 12:05 पासून 12:53 पर्यंत
अमृत काल - 10:10 पासून 11:37 पर्यंत
ब्रह्म मुहूर्त - 04:55 पासून 05:43 पर्यंत
चंद्रबलं आणि ताराबल
ताराबल - हस्त, स्वाति, विशाखा, अनुराधा, ज्येष्ठा, पूर्वाषाढ़ा, श्रवण, शतभिष, पूर्वाभाद्रपद, उत्तराभाद्रपद, रेवती, भरणी, रोहिणी, आर्द्रा, पुनर्वसु, पुष्य, आश्लेषा, पूर्व फाल्गुनी
चंद्रबल- मेष, वृषभ, सिंह, कन्या, धनु, कुंभ
(वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)