ज्योतीषशास्त्रानुसार शुक्राला धन, समृद्धी, आनंद, प्रेम, सौंदर्य यांचा ग्रह मानण्यात आलं आहे. जर पत्रिकेत शुक्र मजबूत असेल तर त्या व्यक्तीला प्रचंड यश मिळतं. 8 ऑगस्टला शुक्र वक्री झाल्याने आणि कर्क अस्त झाल्याने लोकांना अशुभ प्रभावाचा सामना करावा लागणार आहे. शुक्राची वक्री आणि अस्त होणं अनेक राशींवर नकारात्मक प्रभाव टाकत आहे. जर तुमचा शुक्र मजबूत नसेल तर तुम्हाला वैवाहिक आयुष्यात आणि प्रेमात तसंच आर्थिक बाबतींमध्ये अडचणींचा सामना करावा लागतो. दरम्यान 18 ऑगस्टला शुक्राचा उदय होत आहे. शुक्राचा उदय झाल्याने कोणत्या राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल हे समजून घ्या...
कर्क राशीत शुक्राच्या उदयामुळे मेष राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनात काही बदल होऊ शकतात. या दरम्यान या राशीचे लोक थोडे जास्त भावूकही होऊ शकतात. छोट्या छोट्या गोष्टींचा त्रास होईल. नात्यात काही समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. तुमची प्रकृती ठीक असली तरी तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
शुक्राचा उदय मिथुन राशीच्या लोकांसाठी प्रतिकूल ठरू शकतो. तुमच्या संपत्तीच्या घरावर शुक्र असेल. अशा परिस्थितीत तुमच्या बँक बॅलन्समध्ये घट होऊ शकते. कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे तुमचा खर्च वाढू शकतो. या काळात बोलण्यावर नियंत्रण ठेवा आणि सट्टेबाजी किंवा लॉटरी इत्यादीपासून दूर राहा. आरोग्याचीही काळजी घ्या. प्रेमसंबंधात तणाव किंवा जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात.
शुक्राचा उदयही तूळ राशीच्या लोकांसाठी हानिकारक ठरू शकतो. तुमच्या गोचर कुंडलीच्या दहाव्या भावात शुक्र ग्रह अस्त होणार आहे. यादरम्यान तुम्हाला नोकरीत खूप काम करावं लागेल आणि अनावश्यक तणाव येईल. नोकरी किंवा व्यवसायात शांतता राहणार नाही आणि काही समस्यांना सामोरे जावे लागू शकते. आर्थिक नुकसानही होऊ शकते. या काळात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका आणि आपले काम शांतपणे करत रहा.
शुक्राचा उदय मीन राशीच्या लोकांनाही थोडा त्रासदायक ठरु शकतो. आर्थिक तसंच कौटुंबिक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. अनेक आव्हानं येतील. अशावेळी संयम ठेवावा लागेल. मोठे निर्णय घेताना आधी विचार करा.