बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली तर 2025 पासून मानवतेच्या अंताला सुरुवात; जगाच्या कोणत्या भागातून होणार सुरुवात?

बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो. बाबा वेंगा यांनी राष्ट्राचा उदय ते पतन, नव्या महाशक्तींचा उदय, जागतिक कुटनिती अशा महत्वाच्या बदलांबद्दल भविष्यवाणी केली होती. 2024 हे वर्ष जगभरात अनिश्चित उलधापालथीसाठी ओळखले जाईल अशा इशारा बाबा वेंगा यांनी दिला होता. 2024 मध्ये अशा अनेक घटना जगाने पाहिल्या. पण आता वर्ष आपल्या शेवटाकडे चालले आहे. 2 महिन्यातच 2024 हे वर्षे संपेल.असे असताना बाबा वेंगा यांनी 2024 च्या शेवटाबद्दल आणि 2025 या वर्षाबद्दल काय भाकीत केलंय? सविस्तर जाणून घेऊया. 

Pravin Dabholkar | Updated: Oct 8, 2024, 03:48 PM IST
बाबा वेंगाची 'ही' भविष्यवाणी खरी ठरली तर 2025 पासून मानवतेच्या अंताला सुरुवात; जगाच्या कोणत्या भागातून होणार सुरुवात? title=
बाबा वेंगाची भविष्यवाणी

Baba Vanga 2025 Predictions: बाबा वेंगा यांची भविष्यवाणी जगभरात चर्चेचा विषय असते. त्यांनी केलेल्या भविष्यवाणी राजकीय, जागतीक स्तरावर परिणाम पाहायला मिळतो. बाबा वेंगा यांनी राष्ट्राचा उदय ते पतन, नव्या महाशक्तींचा उदय, जागतिक कुटनिती अशा महत्वाच्या बदलांबद्दल भविष्यवाणी केली होती. 2024 हे वर्ष जगभरात अनिश्चित उलधापालथीसाठी ओळखले जाईल अशा इशारा बाबा वेंगा यांनी दिला होता. 2024 मध्ये अशा अनेक घटना जगाने पाहिल्या. पण आता वर्ष आपल्या शेवटाकडे चालले आहे. 2 महिन्यातच 2024 हे वर्षे संपेल.असे असताना बाबा वेंगा यांनी 2024 च्या शेवटाबद्दल आणि 2025 या वर्षाबद्दल काय भाकीत केलंय? सविस्तर जाणून घेऊया. 

बाबा वेंगा यांनी केलेल्या भविष्यवाणीनुसार, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांची हत्या होण्याची शक्यता आहे. त्याच्याच देशातील कोणीतरी त्यांना संपवू शकतो अशी भविष्यवाणी बाबा वेंगा यांनी केली. या घटनेनंतर जगामध्येही खोल अस्थिरतेचा काळ सुरु होऊ शकतो, असे त्यांनी आधीच लिहून ठेवले आहे. एखाद्या अज्ञात प्रमुख देशाकडून जीवघातक चाचणी केली जाऊ शकते. किंवा जैविक शस्त्रांचा वापर केला जाऊ शकतो. अशा विविध कारणांमुळे युरोपमध्ये दहशतवादी हल्ल्यांत वाढ होण्याचा अंदाजही ते व्यक्त करत आहेत. बाबा वेंगा यांनी खूप दशके आधी भविष्यवाणी केली होती. त्यानुसार 2025 वर्षापासून जगाचा सर्वनाश व्हायला सुरुवात होईल. हळुहळू मानवतेचा अंत होईल. माणसाचे पृथ्वीवरील अस्तित्व पूर्णपणे संपायला 5079 हे वर्ष उजाडेल असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते.

युरोपमधून विनाशाला सुरुवात 

2025 मध्ये जगाच्या विनाशाला सुरुवात होईल. याची सुरुवात युरोपातील घटनेमुळे होईल. 2025 मध्ये घडणारी घटना मानवाला विनाशाकडे घेऊन जाईल. आणखी एक भविष्यवेत्ता नेस्त्रादमस यांनीदेखील अशीच एक भविष्यवाणी केली आहे. बाबा वेगा यांनी केवळ जागतिक राजकारणातच नव्हे तर आरोग्य चिकित्सा क्षेत्रातही अनेक महत्त्वाची भविष्यवाणी केली होती. जग वैज्ञानिकदृष्ट्या खूप प्रगती करेल. जीवघेण्या आजारांवरील आतापर्यंत समोर न आलेले उपचारपद्धतीचा शोध लागू शकतो. अल्झायमर आणि कॅन्सरसारखे काही आजार बरे होऊ शकतात, असेही ते म्हणाले. बाबा वेंगा यांच्या काही भविष्यवाणी खऱ्या ठरताना दिसत आहेत. रशियन शास्त्रज्ञ कर्करोगावरील लस विकसित करण्याच्या जवळ आहेत. ही लस लवकरच लोकांसाठी उपलब्ध होऊ शकते, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी काही दिवसांपुर्वी याबद्दलची माहिती दिली होती. एवढेच नव्हे तर युनायटेड किंगडममध्ये फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी डीएनए-आधारित लसीचा विकास देखील वेगात सुरु असल्याची माहिती समोर येत आहे. 

हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ

2024 मध्ये गंभीर हवामानामुळे उद्भवणाऱ्या घटना घडतील. नैसर्गिक आपत्ती येऊ शकते असे भाकीत बाबा वेंगा यांनी केले होते. अलिकडच्या वर्षांत हवामान बदलाच्या घटनांमध्ये वाढ झालेली दिसत आहे. ज्यामुळे बाबा वेंगा यांचे अंदाज अचूक असल्याचे सिद्ध झाले आहे.

जागतिक स्तरावर विनाशकारी नैसर्गिक 

जागतिक हवामान संघटनेने 2024 हे वर्ष विक्रमी उष्ण वर्ष असल्याचे संकेत दिले आहेत. बाबा वंगा म्हणाल्यानुसार ग्रहाच्या कक्षेत बदल होऊ शकतात. ज्यामुळे जागतिक स्तरावर विनाशकारी नैसर्गिक आपत्ती येऊ शकतेय.

 2341 मध्ये पृथ्वीवर विपरित संकट

बाबा वेंगा यांनी लिहून ठेवलेल्या भविष्यवाणीनुसार मानवाने निर्माण केलेल्या नैसर्गिक आपत्तींमुळे पृथ्वी अकल्पनीय संकटात सापडेल. 2341 मध्ये पृथ्वीवर विपरित संकट ओढवेल, असेही भाकीत त्यांनी केले होते. पर्यावरणीय दृष्टीने हे जग सतत बदलतय याचे सारेजण साक्षीदार आहेत. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे.  ZEE 24 TAAS याला दुजोरा देत नाही.)