Religious Rules: हिंदू धर्मात अनेक मान्यता असून समज गैरसमज आहेत. अनेक मान्यता या गैरसमजातून एका पिढीतून दुसऱ्या पिढीपर्यंत जात आहेत. अशीच एक मान्यता पिढ्यानं पिढ्या प्रचलित आहे. रात्रीच्या वेळेत केस आणि नखं कापण्यास घरातील वडिलधारी माणसं मनाई करतात. पण असं सांगण्यामागे काय कारण असू शकतो? असा प्रश्न पडल्याशिवाय राहणार नाही. यामागे धार्मिक मान्यता आहेच, पण वैज्ञानिक कारणही आहे. चला तर मग जाणून घेऊयात काय आहे धार्मिक मान्यता आणि वैज्ञानिक कारण...
धार्मिक कारण
हिंदू धर्मात रात्री केस आणि नखं कापत नाही. रात्री केस किंवा नखं कापल्याने लक्ष्मी अवकृपा होते, असं मानलं जातं. या धार्मिक समजातून घरातील वडिलधारी माणसं रात्री केस आणि नखं कापण्यास मनाई करतात.
वैज्ञानिक कारण
रात्री केस आणि नखं न कापण्यामागे वैज्ञानिक कारण आहे. रात्रीच्या वेळी लोकं खाणं पिणं, फिरणं आणि झोपतात. त्यामुळे कापलेले केस इकडे तिकडे पडतात. कधी कधी कापलेले केस जेवणात येऊ शकतात. तसेच पोटात गेल्याने आजारी पडण्याची शक्यता असते. त्याचबरोबर केसांमुळे अस्वच्छता आणि बॅक्टीरिया देखील पसरतात. यामुळे रात्री केस कापत नाहीत.
दुसरं म्हणजे त्या काळात रात्रीच्या वेळी घरात पुरेसा प्रकाश देखील नसायचा. त्यामुळे अंधारात केसं आणि नखं कापणं अपायकारक ठरू शकते. त्यामुळे केस आणि नखं सूर्यास्तापूर्वी कापत. कारण अंधारात केप कापताना ईजा होण्याची शक्यता असते. त्यामुळे रात्रीच्या वेळी केस आणि नखं कापण्यास मनाई करत.