7 horse Painting: आयुष्यात श्रीमंत व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. यासाठी दररोज प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तर काहीजण श्रीमंत व्यक्ती काय करतात? याचे अनुकरणही करत असतात. श्रीमंत व्यक्तींच्या चालण्या-बोलण्याची पद्धत, त्यांच्या काम करण्याची पद्धत, तसेच ते मानत असलेल्या श्रद्धा, अंधश्रद्धांकडे त्यांच्या फॉलोअर्सचे लक्ष असते. असाच एक प्रकार वास्तुशास्त्राच्या बाबतीत दिसून येतो. यामध्ये हमखास त्याचे अनुसरण झालेले दिसते.
घरात, ऑफिसमध्ये सकारात्मकता येण्यासाठी वास्तुशास्त्रात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. या गोष्टींचे पालन केल्यास वातावरणात आणि पर्यायाने आपल्यात सकारात्मकता येते. यामुळे सुख, समृद्धी आणि यश मिळते. याच कारणामुळे श्रीमंत लोकांच्या घरात काही खास गोष्टी असतात. हे त्यांना सकारात्मक राहण्यास, नेहमी पुढे जाण्यास मदत करते.
यामध्ये झाडे, वनस्पती, चिन्हे, चित्रे, शिल्पे इत्यादींचा समावेश आहे. त्यांच्या जीवनात आनंद, समृद्धी आणि सकारात्मकता टिकून रहावी, यासाठी श्रीमंत लोकांचे घर-कार्यालय सजवताना वास्तुशास्त्राच्या नियमांचीही काळजी घेतली जाते. आज आपण अशाच एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत जी बहुतेक श्रीमंत लोकांच्या घरात दिसते.
वास्तुशास्त्रानुसार सात घोड्यांची चित्रे खूप शुभ आहेत. घोड्यांचे हे चित्र यश, प्रगती आणि सकारात्मकतेचा संदेश देते. धावणारे घोडे जीवनात पुढे जाण्यासाठी नेहमीच प्रेरणा देतात. घरामध्ये किंवा कामाच्या ठिकाणी 7 धावत्या घोड्यांचे चित्र लावल्यास खूप फायदा होतो. असे केल्याने, व्यक्ती सकारात्मक राहते, आव्हानांना खंबीरपणे सामोरे जाते. तो धैर्याने, बुद्धिमत्तेने आणि संयमाने निर्णय घेतो. त्यामुळे त्याला आयुष्यात सतत यश मिळत असते. एकामागून एक यश मिळवून तो उंची गाठतो. भरपूर नाव आणि पैसा कमावतो.
वास्तुशास्त्रानुसार 7 घोड्यांची पेंटिंग वेगवेगळ्या दिशांना लावल्याने वेगवेगळे परिणाम मिळतात. धावणाऱ्या 7 घोड्यांची पेंटिंग दक्षिण दिशेला लावल्यास यश आणि कीर्ती मिळते. दुसरीकडे उत्तर दिशेला घोड्यांची पेंटिंग केल्याने घरात समृद्धी येते. घरात पैसा येतो. पूर्व दिशेला 7 घोड्यांची पेंटिंग केल्याने करिअरमध्ये वाढ होते. अडथळे दूर होऊन काम जलद होते. पण हे लक्षात ठेवा की हे पेंटिंग किंवा घोड्यांचे चित्र बेडरूममध्ये ठेवू नये. ड्रॉईंग रूम किंवा स्टडी रूममध्ये ठेवणे योग्य आहे.
दुसरीकडे, व्यवसायाच्या ठिकाणी तांबे, पितळ किंवा चांदीपासून बनवलेल्या धावत्या घोड्याची मूर्ती ठेवल्यास व्यवसायात लाभासाठी खूप शुभ परिणाम मिळतात. व्यवसायात दिवसेंदिवस प्रगती होत होते. महत्वाचे म्हणजे घोड्याचा पवित्रा आक्रमक नसून शांत किंवा सौम्य असावा, हे लक्षात ठेवावे.
(Desclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याच्याशी सहमत असेलच असे नाही)