Astrology 2022: ज्योतिषशास्त्रात ग्रह आणि नक्षत्र यांना खूप महत्त्व आहे. नक्षत्र आणि गोचर यातील बदलामुळे परिणाम जाणवत असतो. त्यानुसार अंदाज बांधले जातात. देवगुरु बृहस्पती 29 जुलैपासून स्वराशी असलेल्या मीनमध्ये वक्री झाला आहे. गुरु ग्रह 108 दिवस वक्री स्थितीत असणार आहे. म्हणजेच 24 नोव्हेंबरपर्यंत वक्री असेल. या बदलामुळे तीन राशींना चांगलं फळ मिळेल. चला जाणून घेऊयात या तीन राशी कोणत्या आहेत.
वृषभ: गुरु ग्रह वक्री स्थितीत असल्याने या राशींच्या लोकांना चांगलं फळ मिळेल. देवगुरु बृहस्पती गोचर कुंडलीतील 11 व्या स्थानात वक्री झाला आहे. त्यामुळे या काळात उत्पन्नात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. व्यवसायात काही करार निश्चित होतील. तसेच प्रॉपर्टी खरेदी करण्याचा योग देखील आहे. तसेच काही आजारांपासून मुक्तता मिळू शकते.
मिथुन: गुरु ग्रह वक्री झाल्याने मिथुन राशीसाठी चांगले दिवस आले आहेत. कारण गुरु ग्रह मिथुन राशीच्या दहाव्या स्थानात वक्री झाला आहे. दशम स्थान नोकरी, उद्योग-धंद्याशी निगडीत आहे. त्यामुळे चांगल्या नोकरीची ऑफर मिळू शकते. तसचे नोकरीच्या ठिकाणी पदोन्नती मिळू शकते.
कर्क: या राशीच्या नवव्या स्थानात गुरु ग्रह वक्री झाला आहे. नववं स्थान भाग्य आणि विदेश यात्राशी निगडीत आहे. या दरम्यान नशिबाची पूर्ण साथ मिळेल. मानसिक चिंतेतून मुक्तता मिळेल. उद्योगासंदर्भात प्रवासाचे योग जुळून येतील. दुसरीकडे गुरु ग्रह या राशीच्या सहाव्या स्थानाचा स्वामी आहे. आजार, कोर्टकचेरी आणि शत्रूचं स्थान मानलं जातं. त्यामुळे शत्रूंवर विजय मिळू शकतो.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)