मेष- अडकलेली कामं पूर्ण होतील. तुमची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न कराल. दिवस उत्साही असेल. वैवाहिक जोडप्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. जुने आजार दूर होतील.
वृषभ- कामकाजात व्यग्र असाल. मेहनतीने जास्त अर्थार्जनाची संधी आहे. अनेक दिवसांपासून अडकलेली कामं मार्गी लागतील. वेळ चांगली आहे. पुढे जाण्याची संधी मिळेल. प्रवासयोग आहेत.
मिथुन- घाईघाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक परिस्थितीतीविषयी चिंता करु नका. मित्र आणि कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्यातच जास्त वेळ जाईल. पोटाचे विकार उदभवतील.
कर्क- नोकरीत काही अडचणी येतील. दैनंदिन कामातही अडथळे येतील. जास्त विचार करण्यात वेळ वाया घालवू नका. डोकेदुखी सतावेल.
सिंह- कुटुंबात सुख- शांती नांदेल. कामाच्या निमित्ताने नवे करार कराल. कोणा एका दूरच्या गोष्टीवर लक्ष असेल. सहकाऱ्यांकडे आकर्षित व्हाल.
कन्या- कामाचा व्याप वाढेल. कनिष्ठांचा सहयोग मिळेल. अडचणी दूर होतील. दिवस थकवणारा असेल. आराम करा, नाहीतर काही अडचणी उदभवतील.
तुळ- नोकरी आणि व्यापारात धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी दिवस चांगला आहे. इतरांची मर्जी राखून चतुराईने काम करा.
वृश्चिक- व्यापारात तुलनेने फायदा कमीच होईल. बदलीचे योग आहेत. वायफळ कामांमध्ये लक्ष द्याल. अविवाहितांसाठी तणावाचा दिवस आहे.
धनु- दैनंदिन कामं पूर्ण होण्याचा योग आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. आर्थिक परिस्थिती सुधारेल. जेवणात सावधगिरी बाळगा.
मकर- आज कोणतेही नवे व्यवहार करु नका. पैसे अडकतील. मनाविरुद्ध काही खर्च करावे लागतील. कामाचा व्याप वाढेल.
कुंभ- आर्थिक चणचण संपेल. सहकाऱ्यांचा सहयोग मिळेल. आर्थिक तंगी संपेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. प्रयत्नांनी काही अडचणी दूर होतील.
मीन- व्यापार विस्तारीकरणाचा विचार केला नाहीत तर फायद्याचं ठरेल. सावध रहा. प्रेमसंबंधांसाठी दिवस चांगला आहे.