मुंबई : एका आठवड्यात सात दिवस असतात आणि हिंदू धर्मात प्रत्येक दिवस एका विशिष्ट देवाला अर्पण करण्यात आलाय. जसे सोमवार भगवान शंकराला अर्पण करतात, तर मंगळवार गणपती, बुधवार बृहस्पतीचा, गुरुवार दत्ताचा, शुक्रवारचा अंबाबाईचा, शनिवार हनुमानाचा वार असे मानले जाते.
ज्योतिषशास्त्रानुसार, ज्या व्यक्तीचा ज्या दिवशी जन्म होतो त्या वाराचा परिणाम त्याच्यावर होतो. जन्मवारानुसार त्या व्यक्तीचा स्वभाव ठरतो.
सोमवार - ज्योतिषांच्या मते ज्या व्यक्तींचा जन्म सोमवारी होतो अशा व्यक्ती हंसमुख आणि गोड बोलणारे असतात. अशा व्यक्ती धाडसी असतात.
मंगळवार - मंगळवारी जन्मलेल्या व्यक्तींचा स्वभाव उग्र असतात. या व्यक्तींना रक्त आणि त्वचेसंदर्भात आजार होतात.
बुधवार - बुधवारी जन्म घेणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान आहे. या वाराला जन्मलेल्या व्यक्ती आपल्या आई-वडिलांवर खूप प्रेम असते.
गुरुवार - ज्योतिषांच्या मते ज्यांचा गुरुवारी होतो अशा व्यक्ती बुद्धिमान असतात. या व्यक्तींशी चांगली मैत्री होते.
शुक्रवार - शुक्रवारी जन्मणाऱ्या व्यक्ती कोणतेही काम करण्यापूर्वी खूप विचार करतात.
शनिवार - ज्योतिषांच्या मते शनिवारी जन्म घेणाऱ्या व्यक्तींना बिझनेसमध्ये रस असतो.