मुंबई : 'घराची कळा अंगण सांगतं', अशी एक म्हण आपल्याकडे आहेच. त्यामुळे प्रत्येक जण आपले घर स्वच्छ ठेवण्याबाबत दक्ष असतो. त्यात घरातील स्वच्छता आणि टापटीप या गोष्टींना लक्ष्मी म्हणजेच धनसंपत्तीशी जोडले जाते. त्यामुळे प्रत्येकालाच आपले घर स्वच्छ ठेवावेसे वाटते. या कामात तुम्हाला जर तुमची मुले मदत करत असतील आणि ते झाडूही मारत असतील तर, तुम्ही नशीबवान अहात असे मानण्यास हरकत नाही. कारण...
शास्त्र पुराणात झाडूबाबत विशेष नियम सांगितले आहेत. या नियमांना शास्त्रीय आधार नसल्याने आजच्या विज्ञान युगात त्यावर विश्वास बसने कठीण. पण आजही अनेक लोक पुरानात सांगितलेल्या आणि परंपरेने चालत आलेल्या अनेक गोष्टी पाळतात. विशेषत: झाडूबाबात या गोष्टी पाळल्या जातात.
शास्त्र-पुराणाचे दाखले देत झाडूबद्दल काही समज प्रचलीत आहेत. हे समज घरातील झाडू ठेवण्याच्या पद्धतीपासून ते त्याच्या वापरापर्यंत आहेत. जसे की, झाडू हा लक्ष्मीचे प्रतिक आहे. सकाळी दिवस उगविण्याआधिच घरात झाडू मारा. घर सुर्योदय होत असताना आपले घर स्वच्छ असावे. तुम्ही जर घर बदलत असाल तर, नव्या घरात जुन्या घरातील झाडू घेऊन जाऊ नये. हे काही समज नियम म्हणून पाळल्यास घरातील आर्थिक दारिद्रय दूर होते आणि घराला बरकत येते, अशी अनेकांची धारणा आहे.
असे म्हणतात की, घरात झाडू उभा करून ठेऊ नये, असे केल्याने आपले शत्रू वाढतात. घरात वाद निर्माण होतात, असे मानले जाते. झाडू ऊगड्यावर ठेऊ नये. तो घरात अशा ठिकाणी असावा ज्यावर कोणाची सहजासहजी नजर जाणार नाही. खास करून बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला (पाहूणे किंवा इतर कारणांनी घरी येणारे परिचीत, अनोळखी लोक) झाडू दिसू नये.
दरम्यान, झाडू आणि घरातील लहान मुले यांच्याबातही काही विशेष समज आहेत. जसे की, तुमच्या घरातील मुले जर आपली खेळणी सोडून झाडू हातात घेत असतील तर ती साधी गोष्ट नाही. ते विशिष्ट गोष्टींचे संकेत आहेत. घरातील लहान मूल जेव्हा झाडू हातात घेते तेव्हा ते तुमच्या घरात पाहुण्यांचे आगमन होणार असल्याचे लक्षण असते.
लहान मुले आणि झाडू यांच्याबाबत आणखीही एक समज आहे. तो असा, लहान मूल घरातील झाडू हाता घेऊन घरातल्यांचे अनुकरण करत घर साफ करत असेल तर, तेही संकेत आहेत की, तुमच्याकडे लवकरच तुमला आर्थिक लाभ होणार आहे. तुमची आर्थिक उन्नतीकडे वाटचाल सुरू आहे. त्यामुळे लहान मुले झाडू मारत असेल तर, त्यांना रोखू नका. उलट समजून जा तूम्ही उन्नतीच्या दिशेने जाणार आहे...
लहान मुले आणि झाडूबाबत विविध समज गैरसमज यांची चर्चा तर होते. मात्र, एखाद्या घरातील लहान मुलाने झाडू मारलाच नाही. तर, तो कसला संकेत आहे? याबाब मात्र माहिती मिळू शकली नाही.