मुंबई : हिंदू धर्मात तुळशीच्या रोपाला फार महत्व आहे. ज्यामुळे लोकांच्या घरात देखील तुळशीला पवित्र स्थान आहे. त्यामुळे प्रत्येक पूजेत या पवित्र वनस्पतीची पाने वापरली जातात. ज्या जोडप्यांना संततीचे सुख मिळाले नाही, त्यांनी तुळशीची पूजा करावी, असे मानले जाते. तसेच तुळशीची पाने अर्पण केल्यानेच भगवान विष्णू प्रसन्न होतात. असे देखील म्हटले जाते. धार्मिक गोष्टींव्यतीरिक्त तुळशील आयुर्वेदात देखील महत्वाचे मानले जाते. एवढेच काय तर शास्त्रानुसार देखील तुळशीचं आपल्या आयुष्य़ात प्रभाव पडतो.
शास्त्रात असे म्हटले आहे की, साक्षात भगवान विष्णू देखील तुळशीचं म्हणणं कधीही टाळत नाहीत, त्यामुळे जर तुळस तुमच्यावर प्रसन्न असेल, तर तुमच्या आर्थिक समस्या देखील दूर होतात.
परंतु यासाठी तुम्हाला तुळशी पूजन करताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील. ज्यामुळे तुमच्यावर तुळशीमाता नेहमीच तुमच्यावर खुश राहिल.
शास्त्रानुसार ठराविक दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. रविवार, एकादशी, सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण या काळात तुळशीची पाने कधीही तोडू नयेत. याशिवाय अनावश्यक तुळशीची पाने तोडल्याने दोष निर्माण होतो. कारण यामुळे लक्ष्मीला राग येतो.
संध्याकाळी तुळशीखाली दिवा लावल्याने मां लक्ष्मी प्रसन्न होते. तसेच त्याच्या कृपेने कुटुंबात सुख-समृद्धी राहते. घराच्या अंगणात तुळशीचे रोप लावल्याने वास्तू दोष दूर होतात.
वास्तुशास्त्रानुसार तुळशीची वनस्पती नकारात्मक ऊर्जा नष्ट करते. एवढेच नाही तर तुळशीचे रोप कुटुंबाचे वाईट नजरेपासून रक्षण करते.
वाळलेल्या तुळशीचा रोप घरात ठेवणे अशुभ मानले जाते. घरातील तुळशीचे रोप सुकले असेल, तर ते पवित्र नदी किंवा तलावात वाहावे. वाळलेल्या तुळशीचे रोप लावल्यानंतर लगेच नवीन रोप लावू नका.
Disclaimer : इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही.