Guru Gochar 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार व्यक्तीच्या जीवनावर ग्रहांचा विशेष प्रभाव दिसून येतो. कोणता ग्रह कसं फळ देईल हे नक्षत्रावर अवलंबून असतं. दरम्यान आज म्हणजेच 21 जून रोजी दुपारी 1.19 वाजता गुरू ग्रह भरणी नक्षत्रात प्रवेश केला आहे. मुळात गुरुचं गोचर हे खूप खास मानलं जातं.
ज्योतिषशास्त्रात एकूण नक्षत्रांची संख्या 27 आहे. गुरुने भरणी नक्षत्रामध्ये प्रवेश केला आहे. तर हे नक्षत्र यापैकी दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे 5 राशीच्या लोकांसाठी गुरूचं हे गोचर खूप काही राशींसाठी फार फायदेशीर असणार आहे. पाहूयात या राशी कोणत्या आहेत.
तूळ राशीच्या व्यक्ती गुरुच्या गोचर दरम्यान चांगली कामगिरी करू शकतात. तूळ राशीच्या लोकांना या काळात चांगल्या संधी मिळू शकणार आहेत. नोकरदार लोकांना कामामध्ये बढती मिळू शकणार आहे. हा योग तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. तुमच्या कामाचा आणि तुमच्या कंपनीचा विस्तार करण्यासाठी हा उत्तम काळ असणार आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे.
भरणी नक्षत्रातील गुरुचं गोचर धनु राशीच्या लोकांसाठी खूप महत्वाचं असणार आहे. यावेळी अनेक शुभ परिणाम मिळणार आहेत. अचानक अज्ञात स्त्रोताकडून पैसे मिळू शकणार आहेत. खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या या राशीच्या लोकांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे. नवीन बिझनेस सुरु करायचा असेल तर अनेक चांगल्या संधी मिळतील. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची चिन्ह आहेत.
भरणी नक्षत्रात गुरूचं गोचर मकर राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी मान-प्रतिष्ठा देईल. शैक्षणिक क्षेत्राशी निगडीत शुभ परिणाम मिळतील. सरकारी नोकरी करणाऱ्यांनाही लाभाच्या अनेक संधी मिळू शकतात. सोबतच तुम्हाला प्रमोशनही मिळेल. नशिबाच्या चांगल्या पाठिंब्याने तुम्हाला यश मिळू शकणार आहे.
मेष राशीच्या लोकांना बृहस्पतिच्या गोचरमुळे अच्छे दिन येणार आहेत. बिझनेस करणाऱ्यांना कामाच्या संदर्भात शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्हाला भरपूर पैसे मिळतील. लव्ह लाईफही खूप छान असणार आहे. तुम्ही जे काम हाती घ्याल त्या कामामध्ये यश मिळू शकणार आहे.
गुरु भरणी नक्षत्रात प्रवेश केल्याने सिंह राशीच्या लोकांना करिअरमध्ये नशिबाची साथ मिळणार आहे. या काळात भरपूर पैसे मिळतील. समाजामध्ये तुम्हाला मान-सन्मान मिळणार आहे. चांगल्या आर्थिक लाभाचे संकेत आहेत. नोकरीच्या ठिकाणी काही त्रास असेल तर तो दूर होऊ शकणार आहे.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )