Guru Margi Rajyog: गुरुच्या मार्गी स्थितीने बनणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी

Guru Margi Rajyog: 31 डिसेंबर 2023 रोजी गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. यानंतर 1 मे 2024 रोजी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे दोन राजयोग तयार होतील. यामध्ये गजकेसरी आणि केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत. 

सुरभि जगदीश | Updated: Nov 13, 2023, 08:50 AM IST
Guru Margi Rajyog: गुरुच्या मार्गी स्थितीने बनणार 2 राजयोग; 'या' राशींच्या व्यक्तींना लागणार लॉटरी title=

Guru Margi Rajyog: ज्योतिष्य शास्त्रामध्ये प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनुसार, राशीमध्ये बदल करतो. ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रहाला ज्ञान, बुद्धी, धर्म, संपत्ती, अध्यात्म, शिक्षण आणि कर्म यांचा कारक मानले जाते. ज्यावेळी गुरु आपली राशी बदलतो किंवा मार्गस्थ होतो तेव्हा त्याचा जीवनाच्या सर्व क्षेत्रांवर परिणाम होतो. 

31 डिसेंबर 2023 रोजी गुरु ग्रह मार्गस्थ होणार आहे. यानंतर 1 मे 2024 रोजी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. अशातच गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे दोन राजयोग तयार होतील. यामध्ये गजकेसरी आणि केंद्रीय त्रिकोण राजयोग तयार होणार आहेत. जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे राजयोग शुभ सिद्ध होणार आहेत.

मेष रास

ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, गुरु ग्रहाच्या मार्गीमुळे गजकेसरी राजयोग तयार होणार आहे. जे मेष राशीच्या लोकांसाठी खूप शुभ आहे. या काळात गुरूच्या शुभ प्रभावामुळे तुम्हाला तुमच्या नोकरीत नवीन आनंदाची बातमी मिळेल. जोडीदाराच्या सल्ल्याने जे काही काम कराल त्यात यश मिळेल. बेरोजगारांना नवीन नोकरीचे गिफ्ट मिळू शकतं. भौतिक सुखसोयी आणि संसाधनांमध्ये वाढ होईल. गुंतवणुकीतून तुम्हाला अचानक नफा मिळेल. 

कर्क रास

कर्क राशीच्या लोकांसाठी बृहस्पति मार्गी असल्यामुळे अनुकूल मानले जाते. बृहस्पतिमुळे तयार होणारा गजकेसरी योग जीवनात खूप प्रगती करणार आहे. या काळात व्यावसायिकांना विशेष आर्थिक लाभ होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्याचसोबत केंद्र त्रिकोण राजयोगाचा फायदा होणार आहे. गुंतवणुकीतून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे.

सिंह रास

गुरुच्या मार्गी अवस्थेमुळे तयार झालेला केंद्र त्रिकोय राजयोग आणि गजकेसरी योग सिंह राशीच्या लोकांना विशेष लाभ देणार आहे. गुरु गोचराच्या काळात धार्मिक कार्यात रुची वाढणार आहे. या काळात कुटुंबात शुभ कार्य पूर्ण होतील. नोकरीच्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल. प्रवासाच्या योगातून आर्थिक लाभ होईल. नोकरीत बढतीचा लाभ मिळेल. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात.

धनु रास

ज्योतिष शास्त्रानुसार गुरुमार्गी नंतर तयार झालेला गजकेसरी राजयोग आणि केंद्र त्रिकोण राजयोग धनु राशीच्या लोकांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे. या संपूर्ण कालावधीत आर्थिक लाभ होत राहतील. व्यवसाय आणि नोकरीतही मोठी प्रगती होईल. शुभ केंद्र त्रिकोण राजयोगाच्या परिणामी 2024 मध्ये चांगले दिवस येतील. जोडप्यांना प्रेमसंबंधात यश मिळेल. अपूर्ण योजना पुन्हा सुरू होऊ शकतात. 

( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )