Kalatmak Yog 2023 :वैदिक ज्योतिषशास्त्र हे ग्रह आणि नक्षत्राच्या अभ्यास करुन त्याचा परिणाम पृथ्वी, मानवसह जगभरावर कसा होता याची कल्पना देतो. 9 ग्रह हे आपली स्थिती एका ठराविक वेळेनंतर बदलत असतात. यातून अनेक वेळा एकापेक्षा जास्त ग्रह एका राशीत एकत्र येतात. यातून कधी शुभ तर कधी अशुभ योग निर्माण होत असतात. या फेब्रुवारीच्या 6 तारखेला चंद्रदेवाने धनु राशीत प्रवेश केला आहे. तर धनु राशीत आधीपासून शुक्रदेव भ्रमण करत आहे. त्यामुळे चंद्र शुक्र यांच्या संयोगातून अतिशय शुभ असा कलात्मक योग निर्माण झाला आहे. या कलात्मक राजयोगामुळे तीन राशींना नशिबाची साथ मिळणार आहे. (Kalatmak Yog 2023 after 1 year from Venus Moon conjunction these zodiac sign will be rich)
हा संयोग तुमच्या राशीच्या भाग्यस्थानी तयार होत असल्याने कलात्मक राजयोग तुमच्यासाठी फायदेशीर सिद्ध होणार आहे. त्यामुळे तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. या काळात तुम्ही कुटुंब किंवा मित्रांसोबत कुठेतरी फिरायला जाऊ शकता. जुन्या मित्रासोबत भेट तुम्हाला सुखद अनुभव देणार आहे. या काळात, तुम्हाला अचानक पैसा मिळणार आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ असणार आहे.
तुमच्या संक्रमण कुंडलीच्या सातव्या भावात कलात्मक राजयोग अनुकूल ठरणार आहे. या राजयोगामुळे विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखी होणार आहे. परस्पर समन्वय चांगला असणार आहे. तिथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत फिरायला जाणार आहात. तुमच्या कामात आणि व्यवसायातही प्रगती होणार आहे. त्याचबरोबर व्यावसायिकांसाठीही काळ उत्तम सिद्ध होणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही कला, संगीत, मीडिया किंवा फिल्म लाइनशी संबंधित असाल, तर तुम्हाला यावेळी एखादा प्रकल्पाची जबाबदारी मिळणार आहे.
तुमच्या राशीच्या पाचव्या भावात कलात्मक राजयोग निर्माण होत असल्याने तुम्हाला संतती आणि आर्थिक फायदा होणार आहे. यावेळी प्रेमीयुगुलांचं नातं घट्ट होणार आहे. नोकरी आणि व्यवसायातही फायदा होणार आहे. दुसरीकडे, जर तुम्ही मीडिया, संगीत किंवा इतर कोणत्याही क्षेत्रासारख्या सर्जनशील क्षेत्राशी संबंधित असाल तर तुम्हाला चांगली लोकप्रियता मिळणार आहे. त्याच वेळी, तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक लाभ होणार आहे. या काळात मुलांची प्रगती तुम्हाला आनंद देणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)