Lal Kitab: चांदीच्या एका तुकड्यामुळे आर्थिक मार्ग होणार मोकळा! जाणून घ्या लाल किताबमधील उपाय

Lal Kitab: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला कोणत्याही कार्यात अपेक्षित यश मिळत नाही. ग्रह आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. या अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिषीय उपाय केले जातात. पूजा-पाठ, मंत्रोपसना केली जाते. मात्र अनेकदा इतकं करूनही हाती यश लागत नाही. 

Updated: Nov 2, 2022, 08:21 PM IST
Lal Kitab: चांदीच्या एका तुकड्यामुळे आर्थिक मार्ग होणार मोकळा! जाणून घ्या लाल किताबमधील उपाय title=

Lal Kitab: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या अशुभ प्रभावामुळे व्यक्तीला कोणत्याही कार्यात अपेक्षित यश मिळत नाही. ग्रह आणि नक्षत्रांचा मानवी जीवनावर विपरीत परिणाम होत असतो. या अडचणी दूर करण्यासाठी ज्योतिषीय उपाय केले जातात. पूजा-पाठ, मंत्रोपसना केली जाते. मात्र अनेकदा इतकं करूनही हाती यश लागत नाही.  ज्योतिषशास्त्रानंतर (Astrology) लाल किताबमधील तोडगे प्रभावी म्हणून वापरले जातात. यासाठी लाल किताबमध्ये अनेक उपाय दिले आहेत. लाल किताबमध्ये (Lal Kitab) अनेक तोडगे दिले आहेत. हे उपाय वापरल्यानंतर आर्थिक अडचण दूर होते अशी धारणा आहे. आर्थिक अडचण दूर करण्यासाठी लाल किताबात चांदीच्या तुकड्याचे काही उपाय दिले आहेत. 

लाल किताबातील चांदीच्या तुकड्याचा उपाय प्रभावी असल्याचं बोललं जातं. एक चांदीचा तुकडा घरी आणि घरातील धन ठेवण्याच्या जागी ठेवा. तिजोरीत ठेवलेला चांदीचा तुकडा आपल्याकडे धन आकर्षित करतो. त्यामुळे कधीही आर्थिक अडचण येत नाही. तसेच आर्थिक स्थिती मजबूत राहते.

Upasana: आध्यात्मिक प्रगतीसाठी मंत्रोपसना आवश्यक, जाणून घ्या कोणत्या माळेवर कराल जप

लाल किताबमधील तोडग्यानुसार चांदीचा तुकड्यामुळे व्यापार आणि नोकरीतही यश मिळते. चांदीचा तुकडा खिशात ठेवल्याने कर्मभावातील दोष समाप्त होतात आणि व्यक्तीला कर्मानुसार फलप्राप्ती होते. चांदीचा तुकडा खिशात ठेवल्याने चंद्र आणि शुक्र मजबूत होतो. त्यामुळे सुख आणि समृद्धी मिळते. ज्यांच्या राहु दशम आणि केतू चतुर्थ स्थानात असतो. त्यांच्यासाठीही उपाय प्रभावी ठरतो.

(Disclaimer:  इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)