Grah Gochar In Libra 2023: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक महिन्यात ठराविक ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यावेळी ग्रहांचे गोचर सर्व राशींच्या जीवनावर प्रभाव पाडतात. सध्या ऑक्टोबरमध्ये 6 मोठे ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करणार आहेत. या 6 ग्रहांचे संक्रमण सर्व 12 राशींच्या जीवनावर परिणाम करणार आहे.
दरम्यान ऑक्टोबरमध्ये काही ग्रह दोनदा भ्रमण करणार आहे. बुधाच्या गोचरमुळे महिन्याची सुरुवात झाली. यासोबतच या महिन्यात बुध, मंगळ, शुक्र, सूर्य आणि केतू राशीबदल करणार आहेत. यावेळी काही राशींना शुभ तर काही राशींना अशुभ परिणाम मिळणार आहेत. दरम्यान तूळ राशीत बुध, सूर्य, मंगळ आणि केतू यांच्या गोचरमुळे 4 ग्रह एकत्र येणार आहे. या सर्वांचे राशींवर वेगवेगळे परिणाम होणार आहे.
1 ऑक्टोबर 2023 रोजी रात्री 8:29 वाजता बुध कन्या राशीत प्रवेश केला आहे. याचा प्रभाव अनेक राशींच्या जीवनावर शुभ तर काहींच्या जीवनावर अशुभ असल्याचे दिसून आले आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र 2 ऑक्टोबर 2023 रोजी सकाळी 12:43 वाजता सिंह राशीत प्रवेश केला आहे.
3 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5:12 वाजता ग्रहांचा अधिपती शुक्र तूळ राशीत प्रवेश केला आहे.
शास्त्रानुसार 18 ऑक्टोबर रोजी दुपारी 1:18 वाजता सूर्य तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
बुध ऑक्टोबरमध्ये दोनदा राशी परिवर्तन करणार आहे. 19 ऑक्टोबरला बुध तूळ राशीत प्रवेश करेल.
राहु हा मायावी ग्रह मानला जातो. येत्या 30 ऑक्टोबर रोजी तो मेष राशी सोडून मीन राशीत प्रवेश करेल.
ज्योतिष शास्त्रानुसार, केतू 30 ऑक्टोबर रोजी दुपारी 2:13 वाजता तूळ राशीत प्रवेश करणार आहे.
ऑक्टोबरमध्ये 6 मोठे ग्रह आपले स्थान बदलून गोचर करणार आहेत. या ग्रहांच्या गोचरचा परिणाम सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ आणि अशुभ होणार आहे. काही राशीच्या लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडणार आहे. तर काही राशींवर नकारात्मक प्रभाव पडेल.
मिथुन, कन्या, सिंह आणि धनु राशीच्या लोकांना ऑक्टोबर 2023 मध्ये ग्रहांच्या संक्रमणामुळे विशेष लाभ मिळण्याची शक्यता आहे. या काळात या राशींच्या व्यक्तींना प्रमोशन मिळू शकते. ग्रहांच्या गोचरमुळे व्यापार्यांना चांगला नफा मिळू शकतो. जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल. कष्टकरी लोकांनाही त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचं कौतुक होणार आहे.