Mercury Planet Gochar In Capricorn And Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक काळानंतर राशीमध्ये बदल करतो. बुध ग्रह फेब्रुवारी महिन्यात दोनदा आपली राशी बदलणार आहे. ज्यामध्ये बुध 1 फेब्रुवारीला मकर राशीत प्रवेश करणार आहे, तर 20 फेब्रुवारीला बुध कुंभ राशीत प्रवेश करणार आहे.
मकर आणि कुंभ राशीवर शनिदेवाचे राज्य आहे आणि बुध ग्रहाची शनिदेवाशी मैत्री आहे. अशा स्थितीत बुधाच्या संक्रमणाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. परंतु अशा 3 राशी आहेत ज्यांचा सुवर्ण काळ सुरू होणार आहे. या काळात लोकांची करिअर आणि व्यवसायात प्रगती होऊ शकते. जाणून घेऊया कोणत्या राशीच्या व्यक्तींना फायदा होणार आहे.
बुधाचे गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. तुमची सामाजिक प्रतिष्ठा देखील वाढणार आहे. तुम्हाला आर्थिक लाभही मिळेल. व्यावसायिकांसाठी हा काळ खूप चांगला असणार आहे. या काळात तुमचा व्यवसाय पूर्वीपेक्षा खूप चांगला होणार आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन छान राहील. तुमच्या दबलेल्या इच्छा पूर्ण होतील आणि तुम्ही करत असलेल्या कामात यश मिळेल. आयुष्यातील अनेक संकटं दूर होऊ शकतात.
कन्या राशीच्या लोकांसाठी बुध ग्रहाचा राशी बदल शुभ ठरू शकतो. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात यश मिळू शकते. या काळात तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. शिक्षण क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना चांगले यश मिळू शकते. जर तुम्ही विद्यार्थी असाल तर तुम्ही कोणत्याही उच्च संस्थेत प्रवेश घेऊ शकता. नोकरदार लोक नवीन नोकरीच्या शोधात असतील तर तुम्हाला नवीन संधी मिळतील.
मेष राशीच्या लोकांसाठी बुधाचे गोचर अनुकूल ठरू शकणार आहे. बुध ग्रह तुमच्या राशीतून मकर राशीत जाणार आहे. त्यामुळे या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगलं यश मिळू शकतं. या काळात तुमची आर्थिक स्थिती देखील पूर्वीपेक्षा मजबूत होणार आहे. जर तुम्ही व्यापारी असाल तर तुम्हाला व्यवसायात चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला उत्पन्नाच्या इतर स्रोतांची माहिती मिळेल, ज्यामुळे तुमचे उत्पन्न वाढेल. बुद्धिमत्तेचा वापर करून तुम्हाला व्यवसायात प्रचंड यश मिळेल.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )