Monthly Horoscope December 2023 : या 2023 वर्षातील शेवटचा डिसेंबर महिन्यात 5 ग्रहांचा गोचर होणार आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ, सूर्य, बुध, शुक्र आणि गुरू ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. त्यामुळे अनेक शुभ योग आणि राजयोग जुळून आले आहेत. हे योग काही राशींसाठी शुभ तर काहींसाठी अशुभ ठरणार आहे. तुमच्यासाठी डिसेंबर महिना कसा असणार आहे जाणून घ्या डिसेंबर महिन्याचे राशीभविष्य
या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना खूप शुभदायक ठरणार आहे. तुम्हाला या महिन्यात कामात अपेक्षित यश मिळणार आहे. तुमचा मान आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. आर्थिक लाभासह प्रगती होणार आहे. सर्व कामं बुद्धिमत्तेने, सद्दसदविवेकबुद्धीने आणि गोड पाणीने पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहे. व्यावसायिक दृष्टीकोनातून कमिशन, कंत्राटी कामगार आणि सल्लागारांसाठी हा काळ अतिशय लाभदायक असणार आहे. या काळात करिअर आणि व्यवसायात प्रगतीचे प्रत्येक क्षणाला संधी मिळणार आहे. बेरोजगारांना नोकरीची संधी लाभणार आहे. या काळात तीर्थयात्रा जाण्याचे योग आहेत. जे लोक परदेशात करिअर आणि व्यवसायासाठी प्रयत्न करत असाल तर तुमची इच्छा पूर्ण होणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होणार आहे. या काळात तुम्ही कर्ज आणि आजारपणापासून मुक्त होणार आहे. लव्हलाइफमध्ये आनंदाची बातमी मिळणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना संमिश्र असणार आहे. पैसे, आरोग्य आणि वेळेचे काळजीपूर्वक नियोजन तुमच्यासाठी हिताचं ठरेल. बदलत्या हवामानामुळे आजाराचा सामना करावा लागणार आहे. जुनाट आजार तुम्हाला शारीरिक आणा मानसिक त्रासदायक ठरणार आहे. त्रासामुळे तुम्हाला नैराश्य गाठणार आहे. या काळात तुम्हाला खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. व्यवसायिकांनी आर्थिक व्यवहार करताना विचारपूर्वक आणि सल्ला घेऊन निर्णय घ्या. नोकरदारांनी आपलं काम स्वत:च करा. कोणतेही कामात घाई आणि निष्काळजीपणा करु नका. गाडी काळजीपूर्वक चालवा. महिन्याच्या शेवटी तुम्हाला चांगले परिणाम दिसतील. स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना यश मिळले. नात्याकडे दुर्लक्ष करु नका. दांपत्य जीवन सुखी होण्यासाठी छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे तुमच्या हिताचं ठरेल.
या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना संमिश्र असणारा आहे. डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीला घराबाहेरी लोकांची साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ खूष असणार आहे. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी डिसेंबर महिना चांगला असणार आहे. व्यवसायिकांसाठी हा महिन्या शुभदायक ठरणार आहे. या काळात नवीन दुकान किंवा नवीन व्यवसाय सुरु करु शकता. कुटुंबासोबत प्रवासाला जाण्याचे योग आहेत. महिन्याचा मध्यभाग तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असेल. या काळात तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अडचणींना येऊ शकता. विरोधक तुमच्या कृतीत अडथळा आणण्याचा प्रयत्नात असेल. या महिन्यात प्रेमसंबंधात कोणतेही मोठे पाऊल उचलण्यापूर्वी शंभर वेळा विचार करा. अन्यथा वैवाहिक जीवनात छोट्या छोट्या गोष्टींवरून वाद होण्याची शक्यता आहे.
डिसेंबर महिना हा या राशीच्या लोकांसाठी संमिश्र असणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामात यश मिळेल. मित्र आणि नातेवाईकांचं पूर्ण सहकार्य लाभणार आहे. वडिलोपार्जित मालमत्ता मिळवण्यातील अडथळे दूर होणार आहेत. नोकरदार लोकांसाठीही हा काळ अनुकूल असेल. कामाच्या ठिकाणी बॉसचा पूर्ण पाठिंबा मिळणार आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पाची जबाबदारी तुम्हाला दिली जाणार आहे. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल अन्यथा अडचणीत सापडाल. या महिन्यात अचानक कुटुंबासोबत कुठेतरी बाहेर जाण्याचा बेत ठरणार आहे. मात्र प्रवासात तब्येत आणि वस्तूची काळजी घ्या. महिन्याच्या उत्तरार्धात नोकरदारांना प्रमोशन होणार आहे. व्यवसायिकांसाठी हा महिन्यात व्यवसाय वाढीसाठी उत्तम आहे. प्रेमसंबंधांच्या बाबतीत या महिन्यात तुम्हाला पूर्ण ताकदीनिशी लढावं लागणार आहे. जोडीदाराशी प्रमाणिक राहा अन्यथा, नातं संपुष्टात येऊ शकतं. एक्स्ट्रा अफेअर्ससारख्या समस्याही वैवाहिक जीवनात वादळ आणू शकतात.
या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर महिना शुभ आणि अनेक लाभाने भरलेला आहे. या महिन्यात तुम्हाला तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. नोकरदारांना त्यांचा कामाचा चांगला मोबदला मिळणार आहे. राजकारणाशी संबंधित व्यक्तींना उच्च पदे किंवा महत्त्वाच्या जबाबदाऱ्या मिळणार आहे. या काळात समाजात तुमचा मान-सन्मानही द्विगुणीत होणार आहे. व्यापारी व्यक्तींसाठी महिन्याचा दुसरा आठवडा अतिशय शुभ असणार आहे. या काळात त्यांना त्यांच्या व्यवसायात अपेक्षेपेक्षा जास्त लाभ होणार आहे. व्यवसाय विस्ताराच्या योजना फलदायी ठरतील. परदेशाशी संबंधित व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ शुभ असेल. जर तुम्ही तुमच्या व्यवसायात काही बदल करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी उत्तम असेल. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हा महिन्या प्रगतीची आहे. या काळात अविवाहित लोकांचे विवाह निश्चित होऊ होतील. तर विवाहितांच्या घरी नवीन पाहुण्याची चाहुल लागणार आहे. तुमच्यावर कामाचा अतिरिक्त ताण असू शकेल. याकाळात तुमची दिनचर्या आणि खाण्यापिण्याच्या सवयीची काळजी घ्या. प्रेम संबंधांच्या दृष्टीने डिसेंबर महिना तुमच्यासाठी अनुकूल आहे. लव्ह पार्टनरबरोबर खूप चांगले आनंदी वेळ घालविणार आहात. दांपत्य जीवनात आनंदच आनंद असेल.
या राशीसाठी वर्षाचा शेवटचा महिना यश, प्रगती आणि लाभ घेऊन आला आहे. डिसेंबर महिन्यात नशीबाची साथ तुम्हाला मिळणार आहे. तुमची अनेक स्वप्न पूर्ण होणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला धार्मिक किंवा शुभ कार्यक्रमात सहभागी होणार आहात. घरात आणि बाहेर तुमचा मान-सन्मानात वाढ होणार आहे. लोक तुमच्या कामाचं आणि घेतलेल्या निर्णयांचे कौतुक करणार आहेत. ज्यामुळे तुमचा उत्साह आणि आत्मविश्वास वाढ होणार आहे. आरोग्याच्या बाबतीत ही डिसेंबर महिना सकारात्मक असेल. तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढणार आहे. तुमचं कुठलं न्यायालयीन प्रकरण असेल तर ते मार्गी लागणार आहे. त्याचप्रमाणे एखाद्या प्रभावशाली व्यक्तीच्या मदतीने जमीन आणि मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येणार आहे. या महिन्यात मात्र रागावर थोडे नियंत्रण ठेवा, शब्द जपून वापरा अन्यथा होणारं कामही होणार नाही. सिंगल लोकांच्या आयुष्यात जोडीदाराची एन्ट्री होणार आहे. प्रेम जीवनात आनंद असेल तर वैवाहिक जीवनात सुख समाधान असेल.
हा महिना तुळ राशीच्या लोकांसाठी लाभदायक ठरणार आहे. या महिन्यात सुरवातीपासून तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठांशी संबंध मजबूत होणार आहे. या काळात तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढणार आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचं अतिरिक्त मार्ग खुलं होणार असून तुम्हाला आर्थिक फायदा होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात बुद्धिमत्ता आणि शहाणपणाच्या जोरावर तुम्ही विरोधकांवर मात करण्यात यशस्वी होणार आहात. या काळात अशक्य कामं सहज पूर्ण होणार आहे. व्यवसायात इच्छित लाभ मिळणार आहे. स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. तुम्हाला आनंदाची बातमी कानावर पडणार आहे. महिन्याच्या मध्यात कुटुंबासोबत बाहेर गावी जाण्याचा बेत आखाल. एखाद्या प्रभावशाली व्यक्तीची भेट तुम्हाला भविष्यात लाभदायक ठरणार आहे. तुम्ही नवीन व्यवसाय किंवा काम सुरू करणार असेल तर ही उत्तम संधी आहे. कुटुंबियांची आणि मित्रमंडळींची तुम्हाला उत्तम साथ मिळणार आहे. प्रेम संबंधात हा महिना चांगला असेल. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी डिसेंबर संमिश्र असणार आहे. नोकरदारांची बदली आणि पगार वाढ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचेही तुम्हाला साथ देणार आहे. व्यवसायात अपेक्षित नफा मिळणार आहे. या महिन्यातील छोटे मोठे दौरै तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. नवीन व्यवसाय करणार असाल तर हा महिन्या चांगला आहे. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्यांना या महिन्यात विशेष लाभ होणार आहे. महिन्याच्या मध्यात तुमची बुद्धिमत्ता, वाणी आणि विवेकाच्या जोरावर प्रत्येत कामात तुम्ही यशस्वी होणार आहात. या काळात तुमच्यात एक वेगळाच उत्साह आणि आत्मविश्वास असणार आहे. कुटुंबाशी संबंधित कोणत्याही विषयावर महत्त्वाचं निर्णय घेताना कुटुंबातील सर्व सदस्यांचे सहकार्य तुम्हाला लाभणार आहे. परीक्षा आणि स्पर्धेची तयारी करणाऱ्यांसाठी डिसेंबरचा तिसरा आठवडा शुभ असेल. तुमच्या कानावर चांगली बातमी पडणार आहे. डिसेंबर महिना तुमच्यासाठी प्रेमसंबंधांच्या दृष्टीने सर्वसामान्य असेल. तुमचा लव्ह पार्टनर आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुमची साथ देणार आहे. दांपत्य जीवन आनंद असेल.
या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना शुभ आणि फलदायी ठरणार आहे. महिन्याच्या सुरुवातीला कामाच्या अनुषंगाने छोटा किंवा मोठा प्रवास घडणार आहे. कमी किंवा लांब पल्ल्याच्या प्रवासाला तुम्हाला जावं लागणार आहे. प्रवासादरम्यान तुम्हाला अनेक प्रभावशाली व्यक्तींची भेट होणार असून तुम्हाला भविष्यात त्यांच्याकडून लाभ होणार आहे. या काळात अविवाहित व्यक्तींचं लग्न निश्चित होणार आहे. कुटुंबात शुभ कामं ठरणार असल्याने कुटुंबात आनंद असेल. आर्थिकदृष्ट्या हा काळ तुमच्यासाठी लाभदायक ठरणार आहे. नोकरदार लोकांसाठी उत्पन्नाचं नवं स्त्रोत तुम्हाला फायद्याचं ठरणार आहे. जर तुम्ही बराच काळ आपला व्यवसाय वाढवण्याचा विचार करत असाल हा महिन्या तुमच्यासाठी उत्तम आहे. महिन्याच्या मध्यात वरिष्ठ आणि कनिष्ठ या दोघांचेही पूर्ण सहकार्य लाभणार आहे. आपलं सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहेत. धार्मिक आणि सामाजिक कार्याशी संबंधित व्यक्तींना मान-सन्मान वाढणार आहे. महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात रागावर नियंत्रण ठेवा अन्यथा कामं बिघडण्याची शक्यता आहे. या काळात लोकांच्या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं तुमच्या हिताचं ठरेल. या महिन्यात तुम्ही आरोग्याकडे लक्ष द्या. डिसेंबर महिना प्रेमसंबंधाच्या दृष्टीने तुमच्यासाठी अनुकूल असले तर वैवाहिक जीवनात खट्टी मिठ्ठी नोकझोक असणार आहे.
या राशीच्या लोकांसाठी वर्षाचा शेवटचा महिना संमिश्र असणार आहे. मकर राशीच्या लोकांना या महिन्यात इच्छित यश मिळणार आहे. तुमच्या जीवनाशी संबंधित सर्व अडथळ्यांवर सहज मात करण्यात यशस्वी होणार आहात. महिन्याच्या सुरुवातीला, कामाच्या ठिकाणी तुमचं विरोधक तुमच्यावर प्रभुत्व गाजविण्याचा प्रयत्न करु शकता. अशावेळी अतिशय शांत राहून तुम्ही येणाऱ्या आव्हानाच्या सामना करण्यात यशस्वी होणार आहात. केवळ कामाच्या ठिकाणीच नाही तर घरातही समस्या तुमची परीक्षा असणारा हा महिना आहे. वडिलोपार्जित मालमत्ता प्रकरणी समस्या निर्माण होणार आहे. तुम्हाला कोर्टाची पायरी चढण्याची शक्यता देखील आहे. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला तुमच्या सर्व समस्यांपासून काहीसा दिलासा मिळणार आहे. या दरम्यान तुम्हाला तुमच्या जवळच्या मित्रांची पूर्ण साथ मिळणार असल्याने तुम्ही थोडे समाधानी असाल. महिन्याच्या मध्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
हवामान बदलामुळे आरोग्याची समस्या उद्भवू शकते. मात्र हा काळ तुमच्या कामाच्या दृष्टीने अतिशय शुभदायक असेल. करिअर आणि व्यवसायाच्या अनुषंगाने झालेल्या प्रवास उत्तम ठरणार आहे. व्यवसायात इच्छित लाभ मिळणार असल्याने तुम्ही आनंदी असणार आहात. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. प्रेमसंबंधातील भावनांमध्ये अडकून कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नका. जीवनातील चढ-उतारांच्या वेळी तुमचा जोडीदार तुमच्यासोबत उभा असणार आहे.
डिसेंबरची सुरुवात कुंभ राशीसाठी शुभ आणि लाभदायक असणार आहे. तुमच्या मेहनतीचे आणि प्रयत्नांचे इच्छित फळ तुम्हाला मिळणार आहे. सरकारी मदतीतून आर्थिक लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरदार लोकांची इच्छित स्थळी बदली होणार आहे. महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात दीर्घकाळापासून सुरू असलेल्या कौटुंबिक समस्येवर तोडगा निघणार आहे. या दरम्यान तुम्हाला जवळच्या मित्रांसोबत पिकनिकला जाणार आहात. कुटुंबातील एखाद्या प्रिय सदस्याच्या मोठ्या यशामुळे घरात आनंदाचं वातावरण असणार आहे. व्यापारी लोकांसाठी हा महिन्या अत्यंत शुभ असणार आहे. या काळात बाजारात अडकलेले पैसे तुम्हाला परत मिळणार आहे. या काळात तुमची निर्णय क्षमता वाढणार आहे. परीक्षा आणि स्पर्धांची तयारी करणाऱ्यांना या काळात चांगली बातमी कानावर पडणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रम करणारे विद्यार्थी आणि कमिशनवर काम करणाऱ्यांनाही या आठवड्यात अपेक्षित निकाल मिळणार असल्याने आंनदी असणार आहेत. महिन्याच्या उत्तरार्धात गृहीणी धार्मिक कार्यात अधिक रस घेणार आहात. प्रेम संबंधाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सामान्य असेल. लव्ह पार्टनरसोबत प्रेम आणि सामंजस्य असणार आहे. विवाहित लोकांच्या जीवनात जोडीदारासोबत चांगला समन्वय राहणार आहे.
वर्षाचा शेवटचा महिना या राशीसाठी शुभदायक आणि आनंदवार्ता घेऊन आला आहे. महिन्याच्या सुरुवातीपासून तुम्हाला तुमच्या कामात अपेक्षित यश लाभणार आहे. विशेष म्हणजे महिनाभर तुम्हाला तुमच्या खास कामात सर्वांची पूर्ण साथ मिळणार आहे. स्वत:चा व्यवसाय करणाऱ्यांसाठी किंवा स्वत:चं काम करणाऱ्यांसाठी डिसेंबरची सुरुवात अत्यंत शुभ सिद्ध होणार आहे. व्यावसायिकांसाठी हा काळ त्यांच्या कार्यक्षेत्रात इच्छित यश मिळवून देणारा ठरणार आहे. व्यवसायाशी संबंधित लोक आपले वर्चस्व वाढवणार आहे. कंत्राटी पद्धतीने काम करणाऱ्यांना या महिन्याच्या पूर्वार्धात काही मोठे प्रोजेक्ट मिळणार आहे. राजकारणाशी संबंधित व्यक्तींसाठी हा काळ अत्यंत शुभ असणार आहे. त्यांना विशेष पद किंवा जबाबदारी मिळणार आहे. नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना चांगली नोकरीची ऑफर मिळणार आहे. या काळात त्यांना इच्छित यश मिळणार आहे. महिन्याच्या उत्तरार्धात तरुणाई आपला बराचसा वेळ मौजमजेत घालविणार आहेत. प्रेमसंबंधाच्या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे. एखाद्याशी नुकतीच झालेली मैत्री प्रेमात बदलणार आहे. जे लोक आधीपासूनच प्रेमसंबंधात आहेत, त्यांचा परस्पर प्रेम वाढणार आहे. दांपत्य जीवन आनंदी आणि सुखी होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)