Ram Navami 2024 : यंदा रामनवमीचा उत्साह द्विगुणीत असणार आहे. अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाच आगमन यामुळे भक्तांमध्ये एक वेगळाच आनंद दिसून येतं आहे. रामनवमीचं पर्व हे श्रीरामाच्या जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजे नवमी तिथी ही रामनवमी म्हणून साजरी करण्यात येते. पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षाच्या नवमी तिथीला रामनवमी साजरी करण्यात येते. यंदा रामनवमीचा दिवस अतिशय खास आहे यादिवशी अतिशय दुर्मिळ आणि शुभ असा ग्रहांचा संयोग जुळून आला आहे. (Ram Navami 2024 Date shubh muhurat puja vidhi gajkesari and malavya rajyog 5 zodiac sign get money)
पंचांगानुसार चैत्र महिन्यातील शुक्ल पक्षातील नवमी तिथी 16 एप्रिल दुपारी 1.23 मिनिटांपासून दुसऱ्या दिवशी 17 एप्रिल दुपारी 3.14 मिनिटांपर्यंत असणार आहे. उदय तिथीनुसार रामनवमी ही 17 एप्रिलला साजरी करण्यात येणार आहे. श्रीरामाचा जन्म हा दुपारी झाला होता अशी धार्मिक शास्त्रात सांगण्यात आलंय.
या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 11 वाजून 3 मिनिटं ते दुपारी 1 वाजून 38 मिनिटांपर्यंत आहे. त्याच वेळी, दुपारच्या पूजेचा शुभ मुहूर्त 12 वाजून 21 मिनिटांनी आहे. त्यानुसार, प्रभू श्रीरामाची जन्मवेळ 12 वाजून 21 मिनिटे आहे.
पंचांगानुसार, रामनवमीला रवियोग असणार आहे. तसंच यादिवशी सकाळी 11.51 मिनिटांपर्यंत शूल योग असेल. त्यानंतर गंड योग तर आश्लेषा नक्षत्र हे पहाटेपासून पूर्ण रात्रीपर्यंत असणार आहे. गजकेसरी योग आणि मालव्या राजयोग यादिवशी असणार आहे. या राजयोग काही राशींसाठी भाग्यशाली ठरणार आहे.
रामनवमीपासून या लोकांची आर्थिक संकटापासून मुक्तता होणार आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून फायदा होईल. नोकरदार लोकांना पद, प्रतिष्ठा मिळणार आहे. कौटुंबिक समस्या दूर होऊन आनंद असेल. जोडीदारासोबतच नातं मधुर होणार आहे, असं भाकीत ज्योतिषशास्त्र पंडीत यांनी केलंय.
या लोकांना रामनवमीपासून अनेक चांगल्या संधी मिळणार आहेत. या लोकांना आर्थिक लाभही होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद असणार आहे. समाजात मान सन्मान वाढणार आहे.
रामनवमी तुमच्यासाठी शुभ असून तुमचे रखडलेली कामं मार्गी लागणार आहे. वाहन किंवा मालमत्ता खरेदी करु शकता. गरजू लोकांना मदत करणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. करिअरमध्ये प्रगती होणार आहे.
या लोकांची सर्व अडचणीतून सुटका होणार आहे. प्रिय व्यक्तीची भेट होणार आहे. प्रगतीच्या नवीन संधी मिळणार आहे. प्रियजनांकडून भेटवस्तू किंवा आदर मिळणार आहे. संपत्ती वाढ होणार आहे. धार्मिक प्रवास घडणार आहे.
रामनवमी पासून करिअरमध्ये चांगले आणि सकारात्मक बदल दिसणार आहेत. आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबात आनंद आणि सुख नांदणार आहे. जुन्या कर्जातून मुक्तता होणार आहे. कुटुंबातील वादही मिटणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)