Ram Navami Puja Vidhi in Martahi : चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस हा बुधवारी 17 एप्रिलला रामनवमी साजरी करण्यात येते. या तिथीला भगवान विष्णूंनी मानवरुपी रामाचा अवतारात जन्म घेतला होता. वाल्मिकी रामायणानुसार श्रीरामाचा जन्म हा कर्क राशीत दुपारी 12 वाजता अभिजीत मुहूर्तावर झाला होता. चैत्र महिन्यातील नवमी तिथी अतिशय शुभ मानली जाते. यादिवशी रामाचा जन्मामुळे अत्यंत दुर्मिळ असा शुभ योग जुळून आला आहे. यादिवशी राम मंदिरात भव्य सोहळा असतो. तुम्हाला घरात श्रीरामाची पूजा करायची असेल तर शुभ मुहूर्त कुठला, पूजा साहित्य काय लागतं आणि पूजा विधी काय आहे, यासगळ्याबद्दल ज्योतिषचार्य आनंद पिंपळकर यांनी सविस्तर सांगितलं आहे. (ram navami 2024 ram lala puja vidhi and shubh muhurat in marathi)
पंचांगानुसार रामनवमीच्या दिवशी एक विशेष शुभ मुहूर्त आहे. सकाळी 11:40 ते दुपारी 1:45 या वेळेत अभिजित मुहूर्त आहे. याचा अर्थ पूजेसाठी 2.35 मिनिटं आपल्याकडे असणार आहे. दरम्यान, रामजन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. रामनवमीचा मुहूर्त साधून कोणाला घराचे बांधकाम, घराचे वास्तूपूजा, दुकानाचे उद्घाटन, कारखान्याची पूजा, दुकानाची पूजा असे कोणतेही धार्मिक कार्य करायचं असेल तर दोन मुहूर्त शुभ आहे. सकाळी 11.40 वाजता आणि दुपारी 1:40 वाजता तुम्ही धार्मिक कार्य करु शकता.
रामनवमीच्या पूजेमध्ये राम दरबार, राऊली, माऊली, चंदन, अक्षत, कापूर, फुलं, हार, सिंदूर इत्यादींचे गोष्टी लागतात.
श्रीरामाच्या पितळी किंवा चांदीच्या मूर्तीला अभिषेक करण्यासाठी दूध, दही, मध, साखर आणि गंगाजल लागतो.
नैवेद्यासाठी मिठाई, पिवळे कपडे, धूप, दिवा, सुंदरकांड किंवा रामायण ग्रंथ, सुपारीची पाने, लवंगा, वेलची हे साहित्य नक्की आणा.
तसंच अबीर, गुलाल, ध्वजा, केशर, पंचमेवा, पाच फळे, हळद, अत्तर, तुळशीची डाळ बाजारातून आणा.
हवन कुंड, कापूर, तीळ, गाईचे तूप, वेलची, साखर, तांदूळ, आंब्याचे लाकूड, नवग्रह लाकूड, पंचमेवा, ज्येष्ठमध, लवंग, आंब्याची पाने, पिंपळाची साल, वेल, कडुनिंब, चंदनाची साल, अश्वगंधा, नारळ या गोष्टी आणा.
रामनवमीच्या दिवशी ब्राह्म मुहूर्तावर उठून आंघोळ करुन स्वच्छ कपडे परिधान करा. आता सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. तुमच्या परिसरातील रामाच्या मंदिरात जाऊन प्रभूचं दर्शन घ्या. घरी आल्यानंतर पूजा स्थानी कलश स्थापना करा आणि गणेशाची प्रतिष्ठापना करा. भगवान गणेशाची आराधना करा, नंतर रामलल्लाची दुधाचा अभिषेक करा. अभिषेकानंतर त्यांना विविध प्रकारच्या फुलांनी देवाची आराधना करा. वस्त्र परिधान करावे, कपाळावर तिलक लावावा. श्रीरामाचे 108 वेळा जपमाळ करा. त्यानंतर आरती करा आणि नैवेद्य दाखवा.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)