Mangal Uday 2024 : आगामी नविन वर्ष 2024 ची प्रत्येकाला उत्सुकता आहे. आगामी वर्ष हे करिअर आणि आर्थिकदृष्ट्यासह एकंदरीत आपल्यासाठी कसं असेल हे प्रत्येकाला जाणून घ्यायचं आहे. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचा स्थितीचा मानवी जीवनावर आणि पृथ्वीतलावर परिणाम होतो. अशातच 2024 च्या सुरुवातीला अनेक ग्रह आपली स्थिती बदलणार आहे. ग्रहांचा सेनापती, भूमीपुत्र मंगळ देव धनु राशीत उदय होणार आहे. मंगळ हा साहस, जमीन, शौर्याचा कारक मानला जातो. मंगळाच्या गोचरामुळे तीन राशींना प्रचंड धनलाभ होणार आहे. (Rise of Mars in the upcoming year 2024 A lot of financial benefits for these zodiac people Mangal Uday 2024 )
मंगळाचा उदय सिंह राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरणार आहे. तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. वर्षाच्या सुरुवातीला तुमच्या मुलाला नोकरीची चांगली संधी किंवा लग्न होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही विवाहित असाल, तर तुम्हाला गोड बातमी मिळणार आहे. तर मंगळ ग्रह हा तुमच्या राशीच्या चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी असल्याने वाहन आणि मालमत्ता खरेदीचे योग आहे. तसंच, या काळात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे. तुम्ही कामासाठी किंवा व्यवसायासाठी प्रवास करणार आहात.
मंगळ उदय तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. मंगळ तुमच्या राशीतून तिसऱ्या घरामध्ये उदयास येणार असल्याने यावेळी तुमचे धैर्य आणि शौर्य वाढणार आहे. तसंच, कुटुंबातील सर्वांशी तुमचं संबंध प्रेमळ असणार आहेत. तुम्हाला काही चांगली बातमी कानावर पडणार आहे. तुम्हाला तुमच्या भावा-बहिणींचं सहकार्य लाभणार आहे. तसंच, जर तुमचं काम किंवा व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल तर तुम्हाला चांगले आर्थिक लाभ होणार आहे. तुमच्या बँक बॅलन्समध्ये वाढ होणार आहेत.
मंगळ उदय तुमच्यासाठी शुभ ठरणार आहे. कारण मंगळ तुमच्या राशीचा स्वामी असल्याने मंगळ तुमच्या संक्रमण कुंडलीच्या धन घरात उदय होणार आहे. त्यामुळे 2024 च्या सुरुवातीला तुम्हाला अनपेक्षित आर्थिक फायदा होणार आहे. तसंच अडकलेले पैसे तुम्हाला पुन्हा मिळणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमचं नातेही पूर्वीपेक्षा चांगलं होणार आहे. तुमच्या जोडीदारासोबत तुमच्या संयुक्त संपत्तीत लक्षणीय वाढणार आहे. मंगळाच्या प्रभावामुळे तुमचं धैर्य आणि शौर्य वाढणार असून तुमची आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)