Shani Margi 2022 Rajyog: ज्योतिषशास्त्रात नऊ ग्रहांचं विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रहांचा जातकांवर परिणाम होत असतो. शनि हा सर्वात मंद गतीने गोचर करणार ग्रह असून अडीच वर्षांनी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. शनि जेव्हा एखाद्या जातकाच्या राशीत येतात तेव्हा ते त्याच्या कर्मानुसार फळं देतात. शनि आपल्या स्वभानुसार राजाला रंक आणि रंकाला राजा बनवतात. त्यामुळे शनि गोचरावर ज्योतिष्यांचं विशेष लक्ष असतं. 23 ऑक्टोबर रोजी शनिदेव मकर राशीत मार्गस्थ होतील. सध्या शनिदेव वक्री अवस्थेत आहेत. शनिदेवांचा गोचर 3 राशींमद्ये पंच महापुरुष राजयोग तयार करत आहे. हा योग तीन राशींसाठी फलदायी ठरणार आहे.
मेष : शनिदेवाच्या गोचरामुळे मेष राशीत पंच महापुरुष राज योग तयार होईल. यामुळे या लोकांना करिअर आणि पैशाच्या बाबतीत विशेष फायदा होईल. त्यांना नवीन नोकरी मिळू शकते किंवा विद्यमान नोकरीतच पदोन्नती मिळू शकते. व्यवसायात जोरदार नफा होईल. नवीन काम सुरू करण्यासाठी अनुकूल काळ आहे. लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील.
धनु : शनि धनु राशीच्या लोकांनाही खूप शुभ फल देईल. आतापर्यंत करिअरमध्ये ज्या प्रगतीची प्रतीक्षा संपणार आहे. आता तुम्हाला प्रमोशन मिळण्याची दाट शक्यता आहे. पगार वाढेल. अडकलेला पैसा मिळेल. अनपेक्षित आर्थिक लाभ होईल. व्यवसायातही फायदा होईल. आर्थिक स्थिती चांगली राहील. मार्केटिंगशी संबंधित लोकांना विशेष फायदा होईल.
मीन : ज्योतिष शास्त्रानुसार शनिच्या गोचरामुळे मीन राशीच्या लोकांना खूप फायदा होईल. जातकांचे उत्पन्न वाढेल. वाढीव उत्पन्नाचा आनंद मोठा दिलासा देईल. पैसे मिळवण्याचे नवीन मार्ग मिळतील. व्यापाऱ्यांनाही फायदा होईल. नवीन संपर्क व्यवसाय वाढवण्यास मदत करतील. कार-मालमत्ता खरेदी करण्याची दाट शक्यता आहे.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)