Shukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस?

Lakshmi Narayan RajYoga 2023 Zodiac Effects : लवकरच शुक्र आणि बुध यांचं(shukra budh yuti) मिलन होणार आहे. या युतीमुळे लक्ष्मी नारायण योग जुळून आला आहे. 7 ऑगस्टपर्यंत 3 राशींच्या लोकांना धनवर्षाव होणार आहे.

नेहा चौधरी | Updated: Jul 11, 2023, 08:46 AM IST
Shukra Budh Yuti: लवकरच शुक्र बुध युती! लक्ष्मी नारायण योगामुळे 3 राशींना येणार श्रीमंतीचे दिवस? title=
shukra budh yuti creates Laxmi Narayan Rajyoga 2023 Mercury and Venus Union forming Laxmi Narayana Yoga 25 july 3 zodiac signs get wealth

Lakshmi Narayan RajYoga July 2023 : जुलै महिन्याच्या सुरुवातीला शुक्र आणि बुध ग्रहांनी आपली स्थिती बदलली होती. आता लवकरच या दोन ग्रहांची म्हणजे शुक्र आणि बुध (shukra budh yuti) यांची युती होणार आहे. अशात वैदिक ज्योतिषशास्त्रात कुंडलीत लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. या राजयोगामुळे 3 राशीच्या लोकांच्या नशिबात अपार संपत्ती मिळणार आहे. (shukra budh yuti creates Laxmi Narayan Rajyoga 2023 Mercury and Venus Union forming Laxmi Narayana Yoga 25 july 3 zodiac signs get wealth)

कधी आहे लक्ष्मी नारायण राजयोग?

जुलै महिन्याच्या 7 तारखेला शुक्र ग्रहाने सिंह राशीत संक्रमण केलं आहे. आता सिंह राशीत शुक्र 7 ऑगस्टपर्यंत असणार आहे. लवकरच 25 जुलैला बुध ग्रह गोचर (Budh Gochar 2023) करणार आहे. ग्रहांचा राजकुमार 25 जुलैला पहाटे 04:38 वाजता सिंह राशीत प्रवेश करणार आहे. अशा स्थितीत सिंह राशीमध्ये शुक्र आणि बुधाचं मिलन होणार आहे. बुध सिंह राशीत 1 ऑक्टोबरला रात्री 08:45 पर्यंत विराजमान असणार आहेत. 

शुक्र आणि बुध मिलनाने लक्ष्मी नारायण राजयोग तयार होत आहे. हा राजयोग 7 ऑगस्टपर्यंत जाचकांच्या आयुष्यात पैशांचा वर्षावर करणार आहे.  7 ऑगस्टला शुक्र सकाळी 10:37 वाजता कन्या राशीत संक्रमण करणार आहे. 25 जुलै ते  7 ऑगस्टपर्यंत कोणत्या राशींवर धनवर्षावर होणार आहे ते जाणून घ्या. 

मिथुन (Gemini) 

लक्ष्मी नारायण राजयोग हा मिथुन राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायी ठरणार आहे. या लोकांना 25 जुलै ते  7 ऑगस्टदरम्यान अचानक धनलाभ होणार आहे. त्यामुळे या लोकांचं बँक बलेन्स वाढणार असून आर्थिक स्थिती मजूबत घरात येणार आहे. तुम्ही कुठलं कर्ज घेतलं असेल तर त्यातून तुम्ही मोकळे होणार आहात. शुक्र आणि बुध यांच्या मिलनामुळे मिथुन राशीच्या लोकांच्या करिअरला बळ मिळणार आहे. कामाच्या ठिकाणी त्यांचं कौतुक होणार आहे. व्यावसायिकांसाठीही हा काळ शुभ आणि फलदायी ठरणार आहे. 

कन्या (Virgo)

लक्ष्मी नारायण राजयोग हा कन्या राशीच्या लोकांसाठी शुभ संकेत घेऊन आला आहे. या लोकांच्या तिजोरीवर माता लक्ष्मीची कृपा बरसणार आहे. त्यामुळे तिजोरीत छोटी पडेल एवढी धनसंपदा तुमच्या नशिबात आहे. व्यवसायिकांनाही या काळात धनलाभाचे शुभ योग आहेत. नफा आणि नवीन करार होणार आहेत. 25 जुलै ते  7 ऑगस्टदरम्यान तुम्हाला आनंदाची बातमी मिळणार आहे. मालमत्तेसंबंधित समस्या दूर होणार आहे. त्यामुळे कुटुंबात आनंदाचं वातावरण असणार आहे. 

 

हेसुद्धा वाचा - Budh Uday 2023 : आज 'या' लोकांचं भाग्य चमकणार! बुध उदयमुळे कुबेरचा खजिना लागणार हाती

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी लक्ष्मी नारायण राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. एखाद्या वरदानापेक्षा कमी करणार तुमच्यासाठी हा राजयोग. 25 जुलै ते  7 ऑगस्ट हा काळ तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा ठरणार आहे. आर्थिक लाभासोबत करिअरमध्ये तुम्ही उंच शिखर गाठणार आहात. आर्थिक स्थिती मजबूत झाल्यामुळे तुम्ही तणावमुक्त होणार आहात. नवीन नोकरीची संधी तुमच्यासाठी सुवर्ण काळ घेऊन येणार आहे. व्यावसायिकांसाठी हा उत्तम काळ ठरणार असून तुम्ही व्यवसायाची व्याप्ती तुम्ही या काळात वाढविल्यास भविष्यात तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)