Shukra Gochar 2023 : ज्योतिष शास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका विशिष्ट वेळेत संक्रमण करतो. सर्व ग्रहांच्या या संक्रमणाचा शुभ आणि अशुभ प्रभाव दिसून येतो. अवघ्या काही तासांमध्ये आता शुक्र गोचर होणार आहे. 30 मे रोजी संध्याकाळी 07.39 वाजता शुक्र कर्क ( Shukra Gochar ) राशीत प्रवेश करणार आहे. वैदिक पंचागानुसार, शुक्र कर्क राशीत प्रवेश करणार असून काही राशींवर याचा नकारात्मक परिणाम होणार आहे.
शुक्राला एका राशीतून दुसऱ्या राशीत गोचर करण्यासाठी सुमारे 23 दिवस लागतात. कर्क राशीतील शुक्राचं गोचर हे सर्व 12 राशींवर परिणाम करणार असतं. परंतु यावेळी अशा काही राशी आहेत ज्यांच्यावर शुक्राचा अशुभ प्रभाव खूप जास्त असतो. चला तर जाणून घेऊया यामध्ये कोणत्या राशींचा समावेश आहे.
शुक्राच्या गोचरमुळे सिंह राशीच्या राशीच्या लोकांची आर्थिक स्थिती बिघडण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टीने देखील तुमच्यासाठी हा काळ थोडा कठीण असू शकतो. अनावश्यक खर्चांमध्ये अचानक वाढ होणार आहे. परिणामी तुम्ही मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुमच्या शत्रूंकडून त्रास होण्याची शक्यता आहे. जर तुमचा बिझनेस असेल तर त्याचा तोटा तुम्हाला सहन करावा लागू शकतो.
कर्क राशीत शुक्राच्या गोचरमुळे तूळ राशीच्या लोकांना व्यवसायामध्ये नुकसान झेलावं लागण्याची शक्यता आहे. यावेळी कामाच्या ठिकाणी देखील तुम्हाला हुशारीने तसतं सावधगिरी बाळगत काम करावं लागणार आहे. घरात कोणत्या गोष्टीवरून वाद झाले असतील तर ते दूर करताना ते अधिक वाढू शकतात. कामाच्या तसंच बिझनेसच्या ठिकाणी सहकाऱ्यांशी तुमचे संबंध बिघडण्याची दाट शक्यता आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्यासोबत राजकारण होऊ शकतं.
धनु राशीच्या लोकांसाठी शुक्राचं संक्रमण हे कठीण काळ घेऊन येणार आहे. या काळात तुम्ही लपवून कोणतीही गोष्ट करून नका. त्याशिवाय कोणत्याही प्रकारचं अनैतिक काम करणं तुम्ही टाळलं पाहिजे. कुटुंबातील प्रिय व्यक्तींशी होणारा वाद टाळावा लागणार आहे. अनैतिक गोष्टींमधून तुम्ही चार हात लांब रहावं. जर तुमच्यावर कर्ज असेल तर त्याचा डोंगर वाढण्याची शक्यता आहे.
शुक्राच्या गोचरमुळे या राशींच्या व्यक्तींच्या अडचणींमध्ये वाढ होणार आहे. नोकरीच्या ठिकाणी तुम्हाला कामात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. ऑफिसमधील काही सहकारी तुमच्याविरुद्ध कट रचण्याची शक्यता आहे. कुटुंबातून तुम्हाला एखाद्या गोष्टीसाठी विरोध दर्शवला जाऊ शकतो. तुमच्या आरोग्याची तुम्हाला पूर्ण काळजी घ्यावी लागणार आहे. या काळात कोणत्याही प्रकारच्या वादविवादापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा.
( Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. )