Rahu Nakshatra Parivartan: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, एका ठरलेल्या वेळी ग्रह त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. यामध्ये काही ग्रह नक्षत्रात देखील प्रवेश करतात. असंच मायावी ग्रह राहू 8 जुलै रोजी उत्तरा भाद्रपद नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शनिदेव हे उत्तरा नक्षत्राचे स्वामी मानले जातात आणि या नक्षत्राची देवता बृहस्पति आहे जे देवतांचे गुरु आहे.
शनि आणि गुरु यांचे संबंध चांगले मानले जातात. अशा स्थितीत राहुचा नक्षत्रातील बदल काही राशींसाठी फायदेशीर ठरू शकणार आहे. यावेळी काही राशींच्या आयुष्यात सकारात्मक बदल होणार आहेत. जाणून घेऊया यावेळी कोणत्या राशींच्या व्यक्तींना लाभ मिळणार आहे.
राहू ग्रहातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. जर तुम्हाला तुमच्या व्यवसायात काहीतरी नवीन करायचे असेल, तर हा बदल तुमच्यासाठी खूप शुभ असणार आहे. ज्यामुळे तुमच्या व्यवसायाला नवी दिशा मिळणार आहे. नोकरदार लोकांना पदोन्नती दिली जाणार आहे. राहू ग्रहाच्या प्रभावामुळे तुमच्या नेतृत्व क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. जर तुम्ही राजकारणाशी संबंधित असाल तर तुम्हाला चांगले यश मिळू शकते.
मिथुन राशीच्या लोकांसाठी राहू ग्रहाचा नक्षत्र बदल शुभ सिद्ध होऊ शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. पैसे कमवण्याचे नवीन मार्ग सापडतील. तुमच्या नियोजित योजना यशस्वी होतील. नोकरदार लोकांना चांगले लाभ मिळण्याची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.
राहू ग्रहातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकतो. या काळात तुम्हाला वेळोवेळी अनपेक्षित आर्थिक नफा मिळू शकतो. व्यावसायिकांना चांगला नफा आणि प्रगती मिळेल. जे लोक बेरोजगार आहेत त्यांना नवीन नोकरी मिळू शकते. शेअर मार्केटमध्येही नफा होऊ शकतो. नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. या काळात तुम्हाला भौतिक सुख मिळेल. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल आणि सर्व प्रलंबित कामे या काळात पूर्ण होतील.
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)