Budhwar Puja Tips : हिंदू धर्मात प्रत्येक दिवस हा कोणत्या कोणत्या देवतांची पूजा केली जाते. मंगळवार हा गणपतीचा दिवस आहे असं मानलं जातं. पण तुम्हाला माहिती आहे का बुधवारी देखील गणरायाची पूजाअर्चा केल्यास, तुम्हाला गणेशाचा आशिर्वाद मिळतो. जर तुम्हाला कुठल्या कामात यश मिळतं नसेल तर बुधवारच्या दिवशी गणरायाची पूजा केल्यास तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळले. आजच्या दिवशी गणरायाला मोदक किंवा लाडूचा प्रसाद दाखवावा आणि आजच्या दिवशी दुर्वा अर्पण करावा. त्यामुळे बाप्पा प्रसन्न होतो.
ज्योतिष शास्त्रानुसार घरामध्ये पूजेच्या ठिकाणी गणेशजींची मूर्ती स्थापित करा. आसन घालून बसावं आणि गणेशाला लाल फुलं, धूप, दिवा, चंदन, अक्षत आणि फळं अर्पण करावीत. यासोबतच ओम गणेशाय नमः चा जप करत राहा, त्यानंतर योग्य उच्चारांसह गणेश स्तोत्राचं पठण करा. पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावं. (wednesday Budhwar Ganesh Puja Upay get success money)
बुधवारी गणपती बाप्पाला संपूर्ण नारळ अर्पण करणे शुभ मानलं जातं. असं केल्याने घरात पैशाची कमतरता भासत नाही. पुराणात नारळाला लक्ष्मीचं फळ मानलं जातं. त्यामुळे प्रत्येक पूजेत नारळाला खूप महत्त्व आहे.
मोदक आणि लाडू हे गणेशाला खूप प्रिय आहेत, म्हणून गणेशाला लाडू किंवा मोदक अर्पण केल्याने भक्तांची प्रत्येक इच्छा पूर्ण होते, अशी श्रद्धा आहे.
हिंदू धर्मात सुपारी हे गणपती बाप्पाचं प्रतीक मानलं जातं. म्हणूनच गणेशाच्या पूजेत सुपारीचा समावेश करायला विसरू नका. बाप्पाला सुपारी अर्पण केल्याने कुटुंबात आशीर्वाद आणि समृद्धी येते.
याशिवाय बुधवारी मूग डाळीचे दान करावं. यामुळे गणेश आणि लक्ष्मीची कृपा होते आणि कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते.
बुधवारी गायीला हिरवे गवत किंवा पालक खायला द्या.
बुध मंत्रांचा जप करा.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य समजुती आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)