Weekly Horoscope 8 to 14 april 2024 : एप्रिल महिन्याचा दुसरा आठवडा हा वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय खास आहे. कारण या आठवड्याची सुरुवात सोमवती अमावस्या, वर्षातील पहिलं सूर्यग्रहणाने होणार आहे. तर मंगळवारपासून चैत्र महिन्याला म्हणजे हिंदू नवं वर्षाला सुरुवात होणार आहे. गुढीपाडव्याचा सणासोबत चैत्र नवरात्रीलाही प्रारंभ होणार आहे. वर्षातील पहिलं सूर्यग्रहण हे मीन राशीत असणार आहे. त्यात मीन राशीत सूर्यासोबत चंद्रही असणार आहे. अशात हा आठवडा तुमच्यासाठी कसा असेल जाणून घ्या साप्ताहिक राशीभविष्य ज्योतिषशास्त्र पंडीत आंनद पिंपळकर यांच्याकडून
नोकरदार लोकांसाठी हा आठवडा कामाच्या ठिकाणी अडचणीचा असणार आहे. तुमचा हलगर्जीपणा तुमच्या अंगाशी येऊ शकतो. व्यापारी वर्गातील लोकांनी महिला ग्राहकांशी वाद घालू नये, अन्यथा तुमची प्रतिमा खराब होईल. नवीन लोकांची भेट होणार आहे. जीवनात सकारात्मक बदल दिसून येणार आहे. सासरच्या लोकांकडून आर्थिक लाभ होणार आहे. त्यामुळे नात मजबूत होणार आहे. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ दिवस: 9,10,11,12
नोकरदार लोकांसाठी हा आठवडा शुभ असणार आहे. तुमचं परफॉर्मन्सची सर्वत्र चर्चा होणार आहे. व्यापारी वर्गालाही उत्तम फळ मिळणार आहे. आर्थिक स्थिती गडबडणार आहे. नवीन नोकरीची संधी मिळणार आहे. वैवाहिक जीवनात अडचणी निर्माण होणार आहे. आरोग्य सामान्य राहणार आहे. लहान मोठे आजार त्रासदायक ठरणार आहे.
शुभ दिवस: 8,9
या राशीचे लोक जे संशोधनात गुंतलेले आहेत त्यांना फायदा होणार आहे. व्यावसायिकांनी कर्मचाऱ्यांशी हुकूमशाही पद्धतीने वागू नये अन्यथा तुम्ही अडचणीत सापडाल. तरुणांनाही कामात अपयश तर पदरी निराशा पडणार आहे. मोठे निर्णय घेण्यासाठी तुम्हाला कुटुंबाकडून सहकार्य लाभणार आहे. बीपीच्या रुग्णाची प्रकृती या आठवड्यात काहीशी बिघडण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 8,10
या लोकांनी आठवड्यात कुठल्याही निर्णय मार्गदर्शनाशिवाय घेऊन नका. अगदी व्यवसायिकांनी प्रकल्पावर काम करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. तरुणांना नवीन जबाबदारी देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्यावर कामाचा ताण वाढणार आहे. एकटे पालक एकाकीपणाला त्रस्त होऊन आजारी पडू शकतात. तुमच्याही मनात नकारात्मक विचार घर करणार आहे. त्यामुळे तुम्हाला आजारपणाचा सामना करावा लागणार आहे.
शुभ दिवस: 8,9,10,12
या राशीच्या लोकांना आठवड्याच्या सुरुवातीला कामात सावधगिरी बाळगावी लागणार आहे. तुमची बेजबाबदार वृत्ती तुम्हाला महागात पढणार आहे. भागीदारीतील व्यवसायात फायदा होणार आहे. तरुणांनी त्यांच्यामधील उणिवा समजून सुधारण्याचा प्रयत्न करा. भावंडांच्या मदतीने तुमची कामं मार्गी लागणार आहे. या आठवड्यात तुम्हाला प्रियजनांचं महत्त्व कळणार आहे. मानसिक तणाव वाढणार आहे. तणावमुक्त राहण्यासाठी ध्यान करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
शुभ दिवस: 8,10
या राशीच्या लोकांनी तीच चूक पुन्हा करणे टाळावे अन्यथा नोकरीत संकट येण्याची दाट शक्यता आहे. व्यवसायिकांनी या आठवड्यात कमीत कमी प्रवास करणे योग्य ठरेल. कार्यक्षेत्रात वेळेत आणि शक्य तितके कामं पूर्ण करा. तरुणांनी अध्यात्मिक जगात वावर वाढवावा. धार्मिक कार्य करावं. शेजारच्यांशी थांबलेला संवाद पुन्हा सुरु करा. आरोग्याकडे लक्ष द्या.
शुभ दिवस: 10,11
या राशीच्या लोकांना पूर्वीच्या अनुभवांच्या जोरावर नवीन नोकरी मिळणार आहे. पद आणि पैसा दोन्ही तुमच्या मनासारखा मिळणार आहे. व्यवसायिकांना मात्र त्यांच्या कामात अडचणी येणार आहे. तरुणांनी आपल्या वेळेचा सदुपयोग करावा. वैयक्तिक कामातरी व्यस्त राहावे. भावाला आर्थिक मदतीची गरज असले त्याला तुमच्या क्षमतेनुसार मदत करा. भांडणापासून दूर राहा नाही तर उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होऊ शकते.
शुभ दिवस: 9,10,11
तुम्हाला खोटं आणि भावनिक विधान करुन आपली कामं मार्गी लावण्यासाठी काही लोक गंडा घालू शकतात. त्यामुळे सत्य आणि असत्यता तपासून समोरच्याला मदत करा. तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळणार आहे. नातेसंबंध सुधारणार आहे. प्रिय व्यक्तीला भेटवस्तू देणार आहात. संतापाच्या भरात ज्येष्ठ व्यक्तींना दुखवणार आहात. एवढंच नाही तर तुमच्या या कृतीमुळे तुमची प्रतिमा खराब होणार आहे. आरोग्याची काळजी घ्या.
शुभ दिवस: 8,9,10,11
या राशीचे लोक जिद्दीने काम पूर्ण करण्यात यशस्वी होणार आहेत. चैत्र नवरात्रीपासून व्यावसायिक गुंतवणूक करु शकता. नकारात्मक लोकांपासून दूर राहणे तुमच्या हिताचं ठरेल. घर आणि कामात तुम्ही योद्य ताळमेळ राखणार आहात. आजाराकडे दुर्लक्ष करु नका. प्रलंबित कामं मार्गी लावा.
शुभ दिवस: 8,9,12
या राशीच्या लोकांवर या आठवड्यात कामाचा ताण असणार आहे. कर्मचाऱ्यांच्या कामावर लक्ष ठेवा, नाही तर मोठ्या अडचणीत सापडाल. नात्यातील चढ-उतारांमुळे तुम्ही त्रस्त असणार आहात. काही वेळा विभक्त होण्याचे विचारही त्यांच्या मनात येण्याची शक्यता आहे. घरातील समस्यांमध्ये बाहेरील व्यक्तींना ढवळाढवळ करु देऊ नका. घरगुती प्रश्न घरातच सोडवणे तुमच्या हिताचे होणार आहे.
शुभ दिवस: 8,10,12
या राशीच्या लोकांसाठी ऑफिसमध्ये संवाद करणे फायद्याचं ठरेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी चैत्राचा आठवडा शुभ असणार आहे. आठवड्याच्या सुरुवातीला नवीन काम करु नका. तरुणांनी देवीची आराधना करा. या आठवड्यात घरात पूजा, कीर्तन आणि धार्मिक कार्यक्रम केल्यास सकारात्मक ऊर्जेचा वावर राहिल. आरोग्याबद्दल छोट्या कुरकुरी असतील.
शुभ दिवस: 8,9,10,12
या राशीच्या लोकांनी त्यांच्या क्षमतेपेक्षा जास्त कामाचा बोजा घेऊ नये. त्यांची कार्यक्षमता कशी वाढवता येईल याकडेही त्यांनी लक्ष द्यावे. व्यवसायाच्या दृष्टीकोनातून वेळ अनुकूल असणार आहे. तरुणांनी फक्त दिखावा करण्यासाठी खर्च किंवा कर्ज घेऊ नये. घरातील प्रेमप्रकरणांबद्दल बोलण्यासाठी हा आठवडा शुभ असणार आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.
शुभ दिवस: 8,10
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)