Horoscope Money Weekly (25 september to 1 october 2023) : बघता बघता सप्टेंबर महिन्याचा शेवटचा आठवडा सुरु झाला आहे. या आठवडा 5 राशीच्या लोकांसाठी धनलाभ आणि प्रगतीचा आहे. या लोकांना नवीन प्रकल्पातून फायदा होणार आहे. हा आठवडा तुमच्या करिअरसाठी आणि पैशांच्या दृष्टीकोनातून मेष ते मीन या 12 राशींसाठी हा आठवडा कसा असेल जाणून घ्या. (weekly money career horoscope 25 september to 1 october 2023 lucky zodiac signs get money success arthik rashi bhavishy and Ganesh Visarjan and Anant Chaturdashi 2023 )
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगती आणि यश घेऊन आला आहे. या आठवड्यात तुमची आर्थिक स्थितीत हळूहळू सुधारणार आहे. या आठवड्यात तुमच्या कौटुंबिक परिस्थितीत बदलणार आहे. प्रवासातून तुम्हाला सुखद अनुभव येणार आहे. आठवड्याच्या शेवटी कानावर नकारात्मक बातमी पडेल त्यामुळे तुमचं मनं उदास होणार आहे.
शुभ दिवस: 24, 26, 27, 28
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगल राहणार आहे. तसंच तुमचे सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहेत. कुटुंबात सुख-समृद्धी येणार आहे. जर तुम्ही तुमच्या कौटुंबिक बाबतीत संयमाने वागल्यास घरात आनंदाच आनंद असेल. प्रेमसंबंधांमध्ये अहंकाराचा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुमचा खर्चही अतिशय वाढणार आहे, त्यामुळे तुमची आर्थिक स्थिती गडबडणार आहे.
शुभ दिवस: 24, 27
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा लाभदायक असणार आहे. या आठवड्यात तुमच्यासाठी एकामागून एक अनेक फायदेशीर गोष्टी घडणार आहे. आर्थिक बाबतीत यशस्वी होण्यासाठी संयमाने आणि अधिक परिश्रमाने मार्गाने पुढे जाणार आहात. या आठवड्यात प्रवासात सुखद अनुभव मिळणार आहे. नवीन ठिकाणी प्रवासाचे योग आहेत. सप्ताहाच्या शेवटी अहंकाराचा संघर्ष टाळलेलाच बरा.
शुभ दिवस: 24, 27, 28
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आरोग्याच्या दृष्टीने खूप सकारात्मक असणार आहे. या आठवड्यात तुम्हाला खूप निरोगी वाटणार आहे. प्रेमसंबंधातही हा आठवडा सकारात्मक असणार आहे. याशिवाय तुमचं लव्ह लाईफही खूप रोमँटिक असेल. तुमचे प्रेम संबंध मजबूत करण्यासाठी तुम्हाला मजबूत व्यक्तिमत्व असलेल्या व्यक्तीची मदत होणार आहे. कामाच्या ठिकाणी तुमची अचानक फसवणूक होण्याची शक्यता आहे.
शुभ दिवस: 30,26,27
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत खूप भाग्यशाली ठरणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी आर्थिक लाभासाठी वरदान ठरणार आहे. तुमच्या गुंतवणुकीत या आठवड्यात चांगले परिणाम देणार आहे. तब्येतही सुधारणा होणार आहे. मात्र कुटुंबात आपली मतं खुलेपणाने मांडा, तर जीवनात सकारात्मक परिणाम दिसून येतील. या आठवड्यातील प्रवासही तुमच्यासाठी प्रगतीचा ठरणार आहे. कामाच्या ठिकाणीही तुम्हाला दिलेली आश्वासने या आठवड्यात पूर्ण होताना जरा कठीण होणार आहे. आठवड्याच्या शेवटी एक नवीन सुरुवात तुमच्या जीवनात आनंद आणणार आहे.
शुभ दिवस: 25, 26, 28, 29
या राशीच्या लोकांसाठी या आठवड्यात कोणताही नवीन प्रकल्प शुभ परिणाम देणार आहे. आर्थिक बाबतीतही हा काळ तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. या आठवड्यात तुम्ही तुमच्या गुंतवणुकीबाबत गंभीर असणार आहात. कौटुंबिक बाबींमध्ये जास्त मालकी हक्क गाजवणं तुम्हाला कठीण ठरेल. त्याशिवाय इतरांच्या मतांचा आदर केल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येईल. आठवड्याच्या मध्यम तुम्हाला यशाचे संकेत मिळणार आहे. आठवड्याच्या शेवटी, परिस्थिती अचानक तुमच्या बाजूने निर्णय देणार आहे.
शुभ दिवस: 25, 27
या राशीचे लोक या आठवड्यात आपला जास्तीत जास्त वेळ कुटुंबासोबत घालवणार आहेत. या आठवड्यात तुम्हाला कामाच्या ठिकाणी थोडे प्रतिबंधित वाटणार आहे. या आठवड्यात तुमचा आर्थिक खर्च खूप जास्त होणार आहे. कुटुंबातील वडिलांच्या मदतीने जीवनात सुख-समृद्धी नांदणार आहे. या आठवड्याच्या शेवटी जीवनात आनंद आणि सौहार्दाचे शुभ संयोग घडणार आहे.
शुभ दिवस: 27, 29
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा अनुकूल ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला आर्थिक लाभ मिळणार आहे. कार्यक्षेत्रातही चांगली स्थिती असणार आहे. तसंच, तुमचे सर्व प्रकल्प एकामागून एक यशस्वी होणार आहे. एकाच वेळी 2 व्यक्तींकडे आकर्षण होणार आहात. या आठवड्यात प्रवास टाळलेलाच बरा. आरोग्याकडेही लक्ष द्या. आठवड्याच्या शेवटी तुम्ही खूप व्यस्त असणार आहात.
शुभ दिवस: 25, 29
या राशीच्या लोकांसाठी हा आठवडा कार्यक्षेत्रात प्रगती घेऊन आला आहे. तुमचा आदरही वाढणार आहे. या आठवड्यात केलेल्या व्यावसायिक सहली तुमच्यासाठी भाग्यशाली ठरणार आहे. हा आठवडा तुमच्यासाठी धनलाभाचा असणार आहे. लव्ह लाइफ रोमँटिक असणार आहे. या आठवड्यापासून कुटुंबातही बरेच बदल दिसून येईल. तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन जीवनशैली घेऊन येणार आहे. मात्र सप्ताहाच्या शेवटी मेहनतीच्या जोरावर यश मिळणार आहे.
शुभ दिवस: 27, 28
मकर राशीच्या लोकांसाठी हा आठवडा आर्थिक बाबतीत वरदान ठरणार आहे. या आठवड्यात तुम्हाला महिलांच्या सहकार्याने संपत्तीत वाढ होणार आहे. तुमच्या आरोग्यामध्ये सुधारणा होणार आहे. ध्यानधारणा आणि योगामुळे तुमचे आरोग्य निरोगी राहणार आहे. तुम्ही तुमच्या कुटुंबासह आनंदी दिवस घालविणार आहे. तुमच्या सुंदर भविष्यासाठी नियोजनबद्ध काम केल्यास तुम्हाला लाभ होणार आहे.
शुभ दिवस: 30,25,26,27,28
या राशीच्या लोकांना या आठवड्यात नोकरीच्या ठिकाणी प्रगती अनेक संधी घेऊन आला आहे. तसंच तुमचं सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण होणार आहे. आर्थिक बाबतीत, वेळ हळूहळू तुमच्यासाठी बँक बॅलेन्स वाढणारा ठरणार आहे. प्रेमसंबंधात परस्पर प्रेम मजबूत करणारा हा आठवडा आहे. तुमच्या तब्येतीत बरीच सुधारणा होणार आहे. तुम्हाला खूप निरोगीही वाटणार आहे.
शुभ दिवस: 25, 26
या आठवड्यात मीन राशीच्या लोकांनी विचारपूर्वक निर्णय घेतल्यास तुम्हाला सकारात्मक परिणाम दिसून येतील. तुमचं कुटुंब तुमच्या आयुष्यात तुम्हाला साथ देणार आहे. प्रवासातून तुम्हाला अस्वस्थता वाटणार आहे. त्यामुळे या आठवड्यात तुम्ही तुमचा प्रवास पुढे ढकललात तरच बरं होईल. कामाच्या ठिकाणी न्यायालयीन खटल्यांचा तुमच्यावर जास्त भार पडणार आहे. आर्थिक खर्चही जास्त होणार आहे. तर आठवड्याच्या शेवटी आनंद तुमच्या दार ठोठावणार आहे.
शुभ दिवस: 27,29
(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)