मुंबई : अनेकदा असं होतं की आपण नोकरीसाठी प्रयत्न करत असतो. अनेक ठिकाणी नोकरीसाठी अर्ज करतो, कधी कधी तर वशिले देखील लावतो तरी देखील आपल्याला यश मिळत नाही. यामागचं मुख्य कारण हे कदाचित असं असू शकतं की ते क्षेत्र हे तुमच्यासाठी बनलच नाही. ज्योतिषशास्त्र असे सांगितले आहे की, अशा राशी आहेत ज्या विशिष्ट प्रकारच्या नोकऱ्यांसाठी पात्र ठरतात. अशा व्यक्तींनी जर त्याच क्षेत्रात काम नोकरीचा प्रयत्न केला तर त्यांना केवळ मान सन्मानच नव्हे तर आर्थिक मिळकतही अधिक लाभते.
ज्योतिषविद्येचे अभ्यासक सांगतात की सहसा मिथुन व कन्या या दोन राशींच्या व्यक्तींना सर्वात उच्च पदावरील नोकरी मिळण्याची संकेत असतात. या दोन्ही राशींचा स्वामी हा बुध ग्रह आहे, बुध हा बुद्धीचे तत्व म्हणून ओळखला जातो. बुध ग्रह राशीत असणाऱ्या व्यक्तींना बुद्धी, वाणी, सौंदर्य व धन प्राप्तीचे वरदान असते. यामुळेच जेव्हा एखाद्याला अचानक मोठा आर्थिक लाभ होतो किंवा तोटा होतो तेव्हा बुध ग्रहाचे संक्रमण तपासले जाते. तसेच आयुष्यातील महिलांसह तुमचे संबंध कसे असतील हे सुद्धा बुध ग्रहाची स्थिती पाहून ठरवले जाऊ शकते.
जर एखाद्याचा बुध कमकूवत असेल तर आत्मविश्वास कमी असतो आणि बुद्धी असूनही त्यांना काय करावं हे सुचत नाही. अशा कोणत्या राशी आहेत ज्यांचा बुध ग्रह हा बलवान आहे आणि त्यांना कोणत्या क्षेत्रात नोकरी केल्यास अधिक फायदा होऊ शकतो चला हे जाणून घेऊयात..
मेष : मेष राशीच्या व्यक्तींसाठी शिक्षण क्षेत्र उचित ठरते, ओघवती वक्तृत्वाची शैली व समजून सांगण्याचा स्वभाव त्यांना यात मदत करतो
वृषभ : वृषभ राशीसाठी तर्कशुद्ध व चिकित्सक कामे उत्तम ठरतात.
कर्क : कर्क राशीच्या व्यक्तींना आर्थिक व्यवस्थापन उत्तम जमते त्यामुळे मॅनेजमेंट व बँकिंग अशी नोकरी त्यांना लाभदायी ठरू शकते.
सिंह : सिंह रास ही रिस्क- टेकर म्हणजेच धोका पत्करण्यात तरबेज असते त्यामुळे शेअर मार्केट किंवा गुंतवणूक संबंधी कामात त्यांना अधिक फायदा होऊ शकतो.
तूळ : तूळ राशीच्या व्यक्ती न्याय व राजकारणासाठी अधिक उचित ठरतात.
वृश्चिक : वृश्चिक राशीच्या व्यक्ती या नोकरीपेक्षा व्यवसाय करण्यासाठी अधिक उचित ठरतात.
धनु : धनु राशीच्या व्यक्ती या नवनवीन गोष्टी शोधण्यासाठी प्रयत्नशील असतात त्यामुळे विज्ञान किंवा इतर विषयातील संशोधनांची काम इया व्यक्तींसाठी उचित ठरू शकतात.
मकर : मकर राशीला क्रिएटिव्ह असूनही त्यांना पडद्यामागे राहणे आवडते त्यामुळे लेखन, पटकथाकार किंवा अगदी रेडिओ जॉकी असे पर्याय विचारात घेतले जाऊ शकतात.
कुंभ : कुंभ राशीच्या व्यक्ती या सृजनशील असतात त्यामुळे कला व मीडिया हे क्षेत्र त्यांना लाभदायी ठरू शकते.
मीन : मीन राशीच्या व्यक्तींसाठी राजनीती व न्याय क्षेत्र फायदेशीर ठरू शकते. मात्र तिथे हळवेपणा हा मूळ गुण थोडा जपून दाखवावा लागेल.
(विशेष सूचना: इथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. झी 24 तास याची कोणतीही खातरजमा करत नाही. आमचा उद्देश फक्त तुम्हाला माहिती देणं आहे.)