Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे '5' गोष्टींचे दान करा

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला अनेक जण खास करुन बिझनेसमॅन गुप्त दान करतात. काय आहे यामागील कारण आणि कोणत्या गोष्टी दान कराव्यात जाणून घ्या. 

नेहा चौधरी | Updated: Jan 14, 2024, 06:07 PM IST
Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला गुप्त दान का करतात? त्यामुळे कोणते लाभ होतात? हे '5' गोष्टींचे दान करा  title=
Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things

Makar Sankranti 2024 : मकर संक्रांतीला सूर्य उत्तरेकडे प्रवास सुरु करतो आणि त्यामुळे स्वर्गाचे दरवाजे उघडतात, अशी आख्यायिका आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला उत्तरायण असंही म्हटल जातं. मकर संक्रांतीला पवित्र नदीत स्नान करुन सूर्यदेवाला जल अपर्ण करणं शुभ मानलं जातं. त्याशिवाय मकर संक्रांतीला दान केल्यास तुम्हाला शुभ फळं प्राप्त होतात, असं म्हणतात. मकर संक्रांतीला एक अजून प्रथा आहे ती म्हणजे गुप्तदानाची. (Why do give secret donations on Makar Sankranti 2024 What benefits does it bring Donate these 5 things)

गुप्तदानाची प्रथा काय आहे?

अनेक वर्षांपूर्वी तीळाच्या लाडवात बंदा रुपया लपवून ते लाडू गोरगरीबांना, ब्राह्मणांना, मंदिरातील पुजाऱ्यांना अथवा सेवकवर्गाला दान करण्याची प्रथा होती. पण त्यानंतर अनेकांना प्रश्न पडला कोणाला आर्थिक मदत अशी लपवून का करावी? शिवाय लाडू खायचा की त्यात काही आहे हे पाहायचं? शास्त्रात असं म्हटलं आहे की, जेव्हा एखाद्याला अनपेक्षित लाभ होतो त्याचा आनंदाला मोल नसतो. मग त्या दानाला अधिक मोल मिळतो. 

दानापेक्षा गुप्तदानाला अधिक महत्त्व!

दानापेक्षा गुप्तदानाला महत्त्व अधिक असतं असं म्हणतात. कारण खरं पाहता दान हे नेहमीच गुप्त पद्धतीनेच केलं पाहिजे असं म्हटलं जात. मात्र आजकाल मोठ्या गाजावाजा करत दानधर्म केलं जातं. जे दान शांतपणे, कोणाच्या हितासाठी केलं जात त्याचं फळ मिळतं असं धर्मशास्त्र सांगतं. पण जर तुम्ही मी पणाचा अंहकार आणि व्वा व्वा मिळवण्यासाठी दान करता, कुठल्या हेतूने दान करता तेव्हा या दानातून देव प्रसन्न होत नाही, असं शास्त्र सांगते. म्हणून एक म्हणं आहे की, मदत अशी असावी की एका हाताचे दुसऱ्या हाताला कळता कामा नये! 

या काळातही गुप्तदान करणारी लोक पाहिला मिळतात. एचसीएलचे मालक शिव नादर, रिलायन्सचे मुकेश अंबानी, बिर्ला ग्रुपचे कुमार मंगलम, फ्लिपकार्टचे मालक आणि भारतातील तरुण दानशूर बिन्नी बन्सल, टाटा समूहाचे मालक रतन टाटा ही नावं आपण यासाठी आवर्जून घेऊ शकतो. पण शास्त्र असंही म्हणतं दान करण्यासाठी पैसाच पाहिजे असं नाही. त्यासाठी मनाची श्रीमंती लागते. आपल्या घासातील घास सहज इतरांना देता आला पाहिजे. तुम्ही श्रमदान, रक्तदान, अन्नदान, अवयवदान करुनही हे पुण्य किंवा समाधान मिळवं शकता.  

मकर संक्रांतीला हे दान करा!

गूळ

मकर संक्रांतीला गूळ दान करणे शुभ मानलं जातं. गुळाचे दान केल्याने गुरु आणि सूर्याशी संबंधित सर्व समस्या दूर होऊ करिअरमध्ये प्रगती होते, अशी मान्यता आहे. 

काळे तीळ

काळे तीळ आणि शनिदेवाचा संबंध आहे. त्यामुळे मकर संक्रांतीला काळे तीळ दान करणे फलदायी मानले जाते. 

खिचडी

मकर संक्रांतीच्या दिवशी काळ्या उडीद डाळ खिचडीचेही दान केल्यामुळे शनिदोषापासून मुक्ती मिळते, अशी मान्यता आहे. घर धनधान्याने संपन्न राहतं. 

तूप

संक्रांतीच्या दिवशीही तुपाचं दान शुभ मानलं जातं. तुम्हाला शक्य असेल तेवढं तूप दान केल्याने घरात आणि करिअरमध्ये प्रगती होते. भौतिक सुखात वाढ होते असं म्हणतात. 

ब्लँकेट

मकर संक्रांत म्हणजे हिवाळा. मग अशावेळी गरीबांना काळे ब्लँकेट दान करणे शुभ मानले जाते. राहू आणि शनि दोषापासून तुम्हाला मुक्तता मिळते, असं म्हणतात. 

(Disclaimer - या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)