Sachin Tendulkar : क्रीडा विश्वातून मोठी बातमी. (Cricket News) मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचा पुतळा उभारण्यात येणार आहे. ( Sachin Tendulkar statue ) मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) हा निर्णय घेतल्याची माहिती अध्यक्ष अमोल काळे यांनी 'झी 24 तास'ला दिली आहे. येत्या वन डे वर्ल्ड कपदरम्यान भव्य सोहळ्यात पुतळ्याचं अनावरण पार पडेल. 14 नोव्हेंबर 2013 ला वानखेडे स्टेडियमवरच सचिन तेंडुलकरने आपली अखेरची आंतरराष्ट्रीय मॅच खेळली होती. वानखेडे स्टेडियमवर सध्या सचिन तेंडुलकरच्या नावाने एक प्रेक्षक गॅलरी आहे. मात्र आता सचिनचा पुतळाही उभारला जाणार आहे. (A life-size Sachin Tendulkar statue at Wankhede Stadium in Mumbai)
क्रिकेट ज्यांचा धर्म आहे, सचिन तेंडुलकर त्यांचा देव आहे असं नेहमी म्हटलं जातं आणि आता क्रिकेटच्या याच देवाचा पुतळा उभारला जाणार आहे तो मुंबईची क्रिकेट पंढरी म्हणून ओळख असलेल्या वानखेडे स्टेडियमवर. सचिनSS...सचिनSS...असा जयघोष लाखो क्रिकेट फॅन्सकडून ज्या स्टेडियमवर घुमला त्याच स्टेडियमवर सचिनचा पुतळा उभा राहणार आहे. ज्या मैदानानं सचिनला घडवलं त्याच स्टेडियमवर स्पेशल, यादगार आणि अविस्मरणीय असा पुतळा अनावरणाचा सोहळा रंगणार आहे.. येत्या वन डे वर्ल्ड कपदरम्यान हा सोहळा पार पडण्याची शक्यता आहे.
सचिन रमेश तेंडुलकर याची ओळख क्रिकेटचा देव अशीही आहे. भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान, भारतरत्न हा पुरस्कार मिळविणारा तो पहिला खेळाडू आणि सर्वात तरुण आहे. राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित झालेला हा एकमेव क्रिकेटपटू आहेत. 2008 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम केले आहेत. आता पुतळा उभारुन त्याचा अनोखा सन्मान करण्यात येत आहे. या पुतळ्याचे अनावरण 23 एप्रिलला सचिन तेंडुलकर याच्या 50व्या वाढदिवसाला किंवा या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या 50 षटकांच्या विश्वचषकादरम्यान होईल, अशी शक्यता आहे.
सचिन तेंडुलकर याने वयाच्या सोहळ्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले तेव्हा कमी वयात पदार्पण (वन डे) करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पाकिस्तानच्या आकिब जावेदनंतर त्याचा क्रमांक लागत होता. भारताकडून पदार्पण करणारा तो सर्वात लहान खेळाडू होता आणि आजही आहे. सचिन तेंडुलुकर यांने 1989 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर त्याने फलंदाजीत अनेक विक्रम केले आहेत. त्याने कसोटी आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके झळकावली आहेत. कसोटी कारकिर्दीमध्ये सर्वाधिक धावा काढणारा फलंदाज म्हणून त्याचा विक्रम आहे. त्याने 15 हजार 533 धावा केल्यात. 12 हजार कसोटी धावांचा पल्ला गाठणारा पहिला जागतिक फलंदाज ठरला आहे. सचिन याचे बालपण मुंबईत गेले. त्याने क्रिकेटचे धडे दादर जिमखाना येथे गिरवलेत. त्याचे गुरु रमाकांत आचरेकर यांच्याकडून क्रिकेटचे धडे घेतलेत.
14 नोव्हेंबर 2013 रोजी सचिन मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर शेवटचा सामना खेळला होता. विशेष म्हणजे आपल्या करिअरमधील शेवटचा सामना सचिन विडींज विरुद्ध खेळला होता. कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या सर्व संघांविरुद्ध शतके काढण्याचा पराक्रम करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय तर तिसरा जागतिक फलंदाज आहे. त्याच्याआधी ऑस्ट्रेलियाचा स्टीव वॉ आणि दक्षिण आफ्रिकेचा गॅरी कर्स्टन यांनी असा पराक्रम केला होता. राहुल द्रविडनेही असा विक्रम केलेला आहे. सचिन याने भारतासाठी 200 कसोटी सामने, 463 एकदिवसीय आणि एक टी-20 सामने खेळले. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतके (100) आणि धावा (34,357) करण्याचा विक्रम त्याच्या नावावर आहे.