Ambati Rayudu Told Why RCB Loss In IPL : तब्बल 16 वर्ष उलटून गेली तरी देखील आरसीबीला आयपीएल (RCB ipl trophy) ट्रॉफीवर नाव कोरता आलं नाही. आयपीएलच्या फेवरेट मानल्या जाणाऱ्या संघांपैकी आरसीबीचा (Royal Challengers Bangaluru) संघ एक आहे. मात्र, त्यांची पाटी कोरीच राहिलीये. सध्या सुरू असलेल्या आयपीएल हंगामात देखील आरसीबीला 4 पैकी 3 सामन्यात पराभव स्विकारावा लागलाय. घरच्या मैदानावर खेळताना देखील सलग दोन सामने बंगळुरू हरलीये. त्यामुळे आता आरसीबीच्या फॅन्सची निराशा कायम आहे. अशातच आता आरसीबी का जिंकत नाही? असा सवाल चेन्नईची माजी खेळाडू अंबाती रायडू (Ambati Rayudu) याला विचारला गेला होता. त्यावेळी रायडूने स्पष्ट उत्तर दिलं अन् विराट कोहलीला विजयाचं गमक सांगितलं.
काय म्हणतो अंबाती रायडू?
मला वाटतं की, आरसीबीची बॉलिंग लाईनअप नेहमी ओव्हर रन देते. तर त्यांची बॅटिंग लाईनअप क्षमतेपेक्षा कमी प्रदर्शन करतात. तुम्ही जर पाहिलं तर त्यांच्या संघात प्रेशरमध्ये काम कोण करतं? आरसीबीचे युवा फलंदाज आणि दिनेश कार्तिक प्रेशरमध्ये अखेरीस खेळतात. मात्र, तुमच्या संघाची जी मजबूत बाजू आहे ती ड्रेसिंग रुममध्ये बसलेली असते. गेल्या 16 वर्षात आरसीबीची हीच परिस्थिती आहे. जेव्हा जेव्हा प्रेशर हाताळण्याची गोष्ट येते, तेव्हा मोठ्या नावाचा कोणताही खेळाडू आरसीबीकडे नसतो. युवा खेळाडू मिडर ऑर्डरच्या खाली खेळतात. तर मोठे खेळाडू नेहमी केकची क्रिम खाऊन जातात, अशी परिस्थिती असल्यास कधीही टीम जिंकणार नाही, असं अंबाती रायडूने म्हटलं आहे. अंबातीच्या वक्तव्याचं नवज्योत सिंग सिद्धूने देखील समर्थन केलंय.
आरसीबीचा संपूर्ण संघ -
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (C), कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, रजत पाटीदार, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), मयंक डागर, रीस टोपले, मोहम्मद सिराज, यश दयाल, सुयश प्रभुदेसाई, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, विजयकुमार विशक, स्वप्नील सिंग, अल्झारी जोसेफ, टॉम करन, लॉकी फर्ग्युसन, विल जॅक्स, मनोज भंडागे, आकाश दीप, सौरव चौहान, राजन कुमार, हिमांशू शर्मा.