Arjun Tendulkar : गुजरातच्या टीमने केलेल्या अपमानाचा बदला घेणार का आज अर्जुन? पाहा काय आहे प्रकरण?

गुजरातच्या टीमपूर्वी हार्दिक मुंबईच्या टीमचा कर्णधार होता. अशातच हा सामना अर्जुन तेंडुलकरसाठीही (Arjun Tendulkar) तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कदाचित याचं कारण फार कमी लोकांना ठाऊक असेल, जाणून घेऊया अर्जुनसाठी हा सामना का महत्त्वाचा असणार आहे. 

Updated: Apr 25, 2023, 05:04 PM IST
Arjun Tendulkar : गुजरातच्या टीमने केलेल्या अपमानाचा बदला घेणार का आज अर्जुन? पाहा काय आहे प्रकरण?  title=

Arjun Tendulkar : आज आयपीएलमध्ये (IPL 2023) गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात सामना रंगणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना रंगणार आहे. हा सामना गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्यासाठी (Hardik pandya) खूप महत्त्वाचा आहे. याचं कारण म्हणजे गुजरातच्या टीमपूर्वी हार्दिक मुंबईच्या टीमचा कर्णधार होता. अशातच हा सामना अर्जुन तेंडुलकरसाठीही (Arjun Tendulkar) तितकाच महत्त्वाचा असणार आहे. कदाचित याचं कारण फार कमी लोकांना ठाऊक असेल, जाणून घेऊया अर्जुनसाठी हा सामना का महत्त्वाचा असणार आहे. 

गेल्या सिझनमध्ये ज्यावेळी गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला होता, त्यावेळी मुंबईवर गुजरातची टीम भारी पडलेली दिसली होती. त्यामुळे यावेळी मुंबई इंडियन्सची टीम जुना बदला घेण्यासाठी पुन्हा मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे मुंबई इंडियन्समध्ये असलेल्या अर्जुन तेंडुलकरला या सामन्यात स्वतःला सिद्ध करण्यासोबत आयपीएलच्या ऑक्शनमध्ये झालेल्या अपमानाचा बदला देखील घ्यायला आहे. 

अर्जुन का घेणार बदला?

2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये अर्जुन तेंडुलकरवर मुंबई इंडियन्सने 30 लाखांची बोली लगावली होती. तर त्यापूर्वी 2021 मध्ये अर्जुनची बेस प्राईस 20 लाख रूपये होती. त्यावेळीबी मुंबईने बोली लावत त्याला आपल्या ताफ्यात जोडलं होतं. मात्र यावेळी एक अशी घटना घडली, ज्याचा कोणी अंदाज लावला नव्हता. तेव्हाच्या ऑक्शनमध्ये गुजरात टायटन्सनेही अर्जुनवर बोली लगावली होती. त्यावेळी गुजरातने हा निर्णय त्यांचा प्रमुख कोच आशिष नेहरा यांच्या सांगण्यावरून घेतला होता.  

अनेक रिपोर्टनुसार असं समोर आलंय की, यावेळी गुजरात टायन्सचा हेतू अर्जुनवर बोली लावण्यापेक्षा मस्करी करण्याचा होता. इतंकच नव्हे तर नेहराच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू असल्याचंही मिडीया रिपोर्ट्समध्ये म्हटलं होतं. मात्र यानंतर अर्जुनला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आलं होतं.

आजच्या सामन्यात जर मुंबईने अर्जुनचा समावेश केला तर तो गुजरात विरूद्धच्या टीमसमोर पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात गुजरातने लावलेल्या बोलीचा बदल घेण्यासाठी अर्जुनकडे चांगली संधी आहे. शिवाय पंजाबविरूद्धच्या सामन्यानंतर अर्जुनला सोशल मीडियावर अनेक टीकांचा सामना करावा लागलाय. त्यामुळे या सामन्यातून अर्जुनला स्वतःला सिद्ध करून दाखवण्याची संधी आहे.