ऑस्ट्रेलिया : ऑस्ट्रेलियातील अॅडलेडमध्ये सुरू असलेल्या डे-नाईट कसोटीत कांगारू टीम मजबूत स्थितीत दिसत आहे. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची इंग्लंडवरची आघाडी 350 च्या पुढे गेली आहे. दरम्यान या सगळ्यात मैदानाबाहेर एक वेगळाच प्रकार पहायला मिळाला, ज्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर दुसऱ्या डावात तिसऱ्या दिवशी बाद झाला. यानंतर तो ड्रेसिंग रूममध्ये बसला असताना त्या शिंका आली. त्याची शिंका इतकी जोरदार होती की डेव्हिड वॉर्नरची खुर्ची खाली पडण्याच्या मार्गावर होता. जेव्हा डेव्हिड वॉर्नर मागे पडला त्यावेळी स्टीव्ह स्मिथ आणि जस्टिन लँगर एकत्र बसले होते आणि काही काळ ते देखील हैराण झाले.
डेव्हिड वॉर्नरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लोकांनाही हा व्हिडीयो आवडला असून त्यांनी विविध कमेंट्स केल्या आहेत.
Rib soreness + sneezing = scenes.
Poor David Warner #Ashes pic.twitter.com/nfjE6g38hv
— 7Cricket (@7Cricket) December 19, 2021
डेव्हिड वॉर्नरने आतापर्यंत अॅशेसमध्ये चमकदार कामगिरी केली आहे. डेव्हिड वॉर्नर आतापर्यंत नर्व्हस नाईन्टीजमध्ये अॅशेस सामन्यांत दोनदा आऊट झाला आहे. डेव्हिड वॉर्नरने पहिल्या सामन्यात 94 धावा केल्या होत्या, तर या सामन्याच्या पहिल्या डावात तो 93 धावांवर बाद झाला होता.
डे-नाईट कसोटीत ऑस्ट्रेलियाच्या संघाने पहिल्या डावात 473 धावांवर डाव घोषित केला. त्यानंतर इंग्लंडचा संघ अवघ्या 236 धावांवर ऑलआऊट झाला.