क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आशिष नेहरा करणार हे काम

सुमारे 20 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळणारा 38 वर्षीय आशिष नेहरा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत. 1999 पासून टेस्ट आणि 2001 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय टीममध्ये नेहराने पदार्पण केले. 

Updated: Nov 1, 2017, 11:17 AM IST
क्रिकेटमधून निवृत्तीनंतर आशिष नेहरा करणार हे काम title=

नवी दिल्ली : सुमारे 20 वर्षापासून भारतीय संघाकडून खेळणारा 38 वर्षीय आशिष नेहरा आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार आहेत. 1999 पासून टेस्ट आणि 2001 मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये भारतीय टीममध्ये नेहराने पदार्पण केले. 

आपल्या 18 वर्षांच्या करिअरमध्ये नेहराने 17 कसोटीत 44 बळी घेतले. 120 एकदिवसीय सामन्यांत 157 बळी आणि 26 टी -20 मध्ये 34 विकेट्स घेतले. आपल्या संपूर्ण कारकिर्दीदरम्यान, वेगवान गोलंदाज नेहरा आपला वेग, अचूकता आणि लाईन लेंथमध्ये बदल यातून फलंदाजांच्या विकेट घेत असे. पण दुखापतीने त्याला संपूर्ण करिअरमध्ये त्रास दिला.

निवृत्तीनंतरही आशिष नेहरा क्रिकेटसोबत जोडलेला राहणार आहे. तो मागास भागांतील मुलांना क्रिकेट शिकवणार आहे. जहीर खानसोबत नेहराने बुंदेलखंडमध्ये याची सुरुवात देखील केली आहे. सेवानिवृत्तीनंतर नेहरा क्रिकेट अकॅडमीवर लक्ष केंद्रित करणार आहे.