Asia Cup 2023 : पाकिस्तान क्रिकेट बोर्ड म्हणजे पीसीबी (PCB) आणि भारतीय क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय (BCCI) हे यंदाच्या वर्षी होणाऱ्या आशिया कप 2023 च्या (Asia Cup 2023) आयोजनावरून एकमेकांसमोर आले आहेत. यंदाचा आशिया कप हा पाकिस्तान (Pakistan) आयोजित करणार असल्याने भारत पाकिस्तानमध्ये (Will Team India Play In Pakistan?) खेळण्यासाठी जाणार की नाही? असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय. बीसीसीआयचे सचिव जय शहा (jay Shah) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली होती. भारत पाकिस्तानात खेळणार नाही, हे त्यांनी ठणकावून सांगितलं होतं. त्यानंतर आता याच प्रकरणावर महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. (Asia cup 2023 Will Team India Play In Pakistan acc chief jay shah in bahrain emergency meeting bcci pcb latest sports news)
भारत पाकिस्तानमध्ये आशिया कप (Asia Cup 2023) खेळला नाही तर पाकिस्तान भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमध्ये (ODI World Cup 2023) भाग घेणार नाही, अशी भूमिका पाकिस्तान क्रिकेटने घेतली होती. त्यानंतर त्यांनी नरमाईची भूमिका घेतली. एशियन क्रिकेट काऊन्सीलने नजम सेंठींसाठी (Najam Sethi) चर्चेची दारे उघडली. आशियाई क्रिकेट परिषदेची (ACC) 4 फेब्रुवारी रोजी बहरीनमध्ये बैठक होणार आहे. यामध्ये आशिया चषक स्पर्धेच्या ठिकाणावर गंभीर चर्चा होणार आहे.
जय शहा यांनी नियमांनुसार एसीसीचे (ACC TimeTable) वेळापत्रक जाहीर केले होते. त्यावर देखील पाकिस्तानने आक्षेप घेतला होता. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला 22 डिसेंबर रोजी मेलद्वारे माहिती मिळाली होती, असं एसीसीकडून सांगण्यात आलं होतं. त्यानंतर समितीच्या बैठकीत हे वेळापत्रक पारित करण्यातं आलं. त्यामुळे आता भारत पाकिस्तान (India vs Pakistan) वाद पुन्हा एक मोठ्या मंचावर पोहोचला आहे. बहरीनमधील बैठकीत (Bahrain Meeting) तोडगा निघणार की नाही?, असा सवाल आता उपस्थित होताना दिसतोय.
दरम्यान, टीम इंडियाने 2005-06 मध्ये पाकिस्तानचा दौरा (Pakistan Tour) केला होता. त्यावेळी दोन्ही देशांच्या संघांमध्ये 2 कसोटी आणि 5 एकदिवसीय सामने खेळले गेले होते. आशिया चषक सप्टेंबर महिन्यात एकदिवसीय फॉरमॅटमध्ये (ODI Cricket) खेळवला जाणार आहे. ज्यामध्ये भारत आणि पाकिस्तान संघ एकाच गटात आहेत. तर दुसऱ्या गटात गतविजेता श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या संघांचा समावेश असणार आहे.