ICC World Test Championship final 2023: भारत आणि ऑस्ट्रेलिया (Australia vs India) यांच्यात खेळल्या गेलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनल सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टीम इंडियाचा पराभव केला. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियन संघाने टेस्ट क्रिकेटची बादशाहात पटकावली आहे. त्यामुळे आता करोडो भारतीयांच्या स्वप्नांचा चुराडा झाल्याचं पहायला मिळतंय. ऐतिहासिक सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा 209 धावांनी पराभव केला आणि टेस्ट क्रिकेटची चॅम्पियनशीप पटकावली आहे.
पहिल्या डावात आधीच मिळालेली 173 धावांची मजबूत आघाडी आणि दुसऱ्या डावात 270 करत 443 धावांचं टार्गेट इंडियाला दिलं. मात्र, टीम इंडियाला हे आव्हान पूर्ण करता आलं नाही. टीम इंडियाची चांगली सुरूवात दिली, तरी विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे या फलंदाजांना सामना खेचून घेऊन जाता आला नाही. शुभमन गिलने देखील दुसऱ्या डावात निराशाजनक कामगिरी केली. पाचव्या दिवशी कांगारूंना सामना जिंकण्यासाठी 7 विकेटची गरज होती. अशातच ऑस्ट्रेलियाने पहिल्या 2 तासात टीम इंडियाचा खेळ खल्लास केला.
Congratulations, Australia!
A roaring victory in the ICC World Test Championship 2023 Final #WTC23 | #AUSvIND pic.twitter.com/VE01bWheMQ
— ICC (@ICC) June 11, 2023
टॉस जिंकून कॅप्टन रोहित शर्माने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सुरूवातीचे धक्के खालल्यानंतर कांगारूंनी चिवट फलंदाजी करत भारतीय गोलंदाजांना आस्मान दाखवलं. पहिल्या डावात 469 धावा करत ऑस्ट्रेलियाने चांगली मजल मारली होती. 470 धावांचा पाठलाग करताना भारताचा संघाला केवळ 296 धावा करता आल्या. त्यामुळे पहिल्याच डावात ऑस्ट्रेलियाने 173 धावांची मजबूत आघाडी घेतली. त्यामुळे सामन्यात नेहमी ऑस्ट्रेलियाचं पारडं जड राहिलं.
आणखी वाचा - AUS vs IND: Shubman Gill सौरव गांगुलीमुळे आऊट झाला? ICC च्या निवेदनामुळे नवा ट्विस्ट
दरम्यान, सामन्याच्या पाचही दिवशी सामन्यावर कांगारूंचं वर्चस्व राहिलं. चौथ्या दिवसाच्या लंचनंतर टीम इंडियाने कमबॅक केल्याचं चित्र होतं. मात्र, भारतीय फलंदाजांना मैदानात पाय टिकवता आलं नाही आणि आयसीसी ट्रॉफीचा वनवास कायम राहिला आहे. ऑस्ट्रेलियाकडून रोहितसेनेचा मानहानीकारक पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
दरम्यान, गेल्या 10 वर्षात टीम इंडियाला एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. अशातच आता टीम इंडियाला आणखी प्रतिक्षा करावी लागणार आहे.