Rohan Bopanna Create History : केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या एक दिवसआधी पद्म पुरस्कारासाठी निवडलेल्या व्यक्तींची यादी जाहीर केली होती. त्यात सर्वात प्रसिद्ध नाव होतं ते रोहन बोपण्णा याचं... अशातच काल पद्म पुरस्कार जाहीर झाला अन् आज रोहन बोपण्णा याने इतिहास रचला आहे. रोहन बोपन्ना हा ग्रँड स्लॅम स्पर्धेत पुरूष दुहेरीच्या अंतिम फेरीत (Mens doubles Grand Slam champion) पोहचणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला होता. आता ऑस्ट्रेलियन ओपन जिंकून तो पुरूष दुहेरीचे ग्रँडस्लॅम जिंकणारा सर्वात वयस्कर टेनिसपटू ठरला आहे. (Rohan Bopanna become Grand Slam champion)
दोनच दिवसांपूर्वी बोपण्णाने वर्षातील पहिल्या ग्रँड स्लॅम ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली होती. बोपण्णा आपला जोडीदार मॅथ्यू एबडेनसह प्रथमच या ग्रँडस्लॅमच्या अंतिम फेरीत पोहोचला होता. अशातच ऑस्ट्रेलियन ओपनच्या पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि मॅथ्यू एबडेन या जोडीने अंतिम फेरीत सिमोन बोलेली आणि आंद्रिया वावासोरी या इटालियन जोडीचा सरळ सेटमध्ये पराभव केला आहे. बोपण्णा आणि एबडेन यांनी हा सामना ७-६ (७-०), ७-५ अशा फरकाने जिंकला.
पाहा तो क्षण
Huge applause to @rohanbopanna and @mattebden for clinching their 1st Grand Slam as a duo- #AO2024 Men's Doubles Title!
Rohan Bopanna, defying odds at winning his maiden #AusOpen title… pic.twitter.com/UePj3QOuIh
— Anurag Thakur (@ianuragthakur) January 27, 2024
ओपन एरामध्ये ग्रँड स्लॅम जिंकणारा रोहन बोपण्णा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. त्याला जेतेपद पटकावण्यासाठी तब्बल 61 सामने खेळावे लागले. 61 व्या सामन्यात त्याचं स्वप्न पूर्ण झालंय. रोहन बोपण्णाचे हे दुसरं ग्रँण्डस्लॅम जेतेपद आहे. यापूर्वी 2017 मध्ये बोपण्णाने फ्रेंच ओपनमध्ये कॅनडाच्या गॅब्रिएला डॅब्रोव्स्कीसोबत मिश्र दुहेरीचे विजेतेपद पटकावलं होतं.
दरम्यान, तुमचा क्षण कधीही, कुठेही येऊ शकतो. रोहन बोपन्नाने 43 व्या वर्षी जेतेपद पटकावलं आहे. तुम्हीही प्रशिक्षण सुरू ठेवा, स्वप्न पाहत रहा आणि जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा पुढे जाण्यासाठी तयार रहा, असा सल्ला सचिन तेंडूलकरने तरुण खेळाडूंना दिला आहे. क्रिडामंत्री अनुराग ठाकूर यांनी देखील ट्विट करत रोहन बोपन्नाचं अभिनंदन केलं आहे.