नवी दिल्ली : बार्सिलोनाने स्पॅनीश फुटबॉल लिगमध्ये सेविला २-१ अशा फरकाने पराभूत केले. सामन्याची सुरूवातच बार्सिलोनाने आपल्या विक्रीमी कामगिरीने केली.
अल्कासेरच्या तुफानी दोन गोलच्या बदल्यात बार्सिलोनाने ही आघाडी घेतली. या लिगमध्ये बार्सिलोना अत्यांत अव्वल कामगिरी करत आहे. लिगमध्ये झालेल्या सुरूवातीच्या ११ सामन्यांतील बार्सिलोनाचा हा १० विजय आहे.
सामन्याच्या सुरूवातीला सेविलाने मैदानावर जोरदार पकड ठेवली होती. पण, मध्यांतरानंतर सेविलाचा बचाव काहीसा कमी पडू लागला. ज्याचा फायदा बार्सिलोनाने उठवला. बार्लिलोनाने पहिला गोल केला. त्यानंतर काही सेकंदातच सेविलाकडूनही गोल झाला आणि सामना बरोबरीत आला. ही बरोबरी १-१ अशी होती.
दरम्यान, सहाव्या मिनीटानंतर बार्सिलोनाने आणखी एक गोल करत समना २-१ अशा स्थितीत नेऊन ठेवला. पुढच्या काही मिनीटांत काही बदल होईल असे अपेक्षीत होते. मात्र, बार्सिलोनचे आव्हान सेविलाला मोडीत काढता आले नाही. सामना २-१ अशाच स्थिती राहीला. अखेर बार्सिलोनचा विजय झाला.
बार्सिलोनाकडून आपला ६००वा सामना खेळत असलेल्या लियोनल मेस्सीला एकही गोल करता आला नाही. या विजयानंतर बार्सिलोना रीयाल मॅद्रीदवर ११ गुणांची आगाडी घ्यायची आहे. मात्र, लॉस पेल्मसचे आव्हान बार्सिलोनला पेलावे लागणार आहे.