मुंबई: भारत आणि श्रीलंका ( India VS Sri lanka) यांच्यात खेळल्या जाणाऱ्या मालिकेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. भारत दौऱ्यावर श्रीलंकेचा संघ 3 टी-20 आणि 2 कसोटी सामने खेळणार आहे. BCCI ने मंगळवारी या मालिकेच्या वेळापत्रकात बदल जाहीर केला. श्रीलंकेचा संघ भारत दौऱ्यावर प्रथम कसोटी मालिका आणि त्यानंतर टी-20 सामने खेळणार होता. (India vs Sri lanka Schedule)
या महिन्यात भारत दौऱ्यावर येणारा श्रीलंकेचा संघ प्रथम तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यानंतर दोन कसोटी सामने खेळवले जातील, ज्यामध्ये शेवटचा सामना गुलाबी चेंडू कसोटी म्हणजेच डे नाईट असेल. 24 फेब्रुवारी, 27 फेब्रुवारी आणि 27 फेब्रुवारीला श्रीलंका भारतासोबत टी-20 सामने खेळणार आहे. तर पहिली कसोटी 4 मार्च ते 8 मार्च दरम्यान होणार आहे. त्यानंतर लगेचच 12 मार्च ते 16 मार्च दरम्यान दोन्ही संघ डे नाईट कसोटी सामने खेळणार आहेत.
यापूर्वी भारतीय संघ 25 ते 1 मार्च दरम्यान पहिला कसोटी सामना खेळणार होता. यानंतर 5 ते 9 मार्च दरम्यान मोहाली येथे दुसरा कसोटी सामना खेळवला जाणार होता. 13 मार्च रोजी टी-20 मालिकेतील पहिला सामना मोहाली येथे आयोजित करण्याचे नियोजित होते. दुसरा सामना 15 मार्च रोजी धर्मशाला येथे खेळवला जाणार होता तर शेवटचा T20 सामना 18 मार्च रोजी लखनौमध्ये खेळला जाणार होता.
नव्या वेळापत्रकानुसार टी-20 मालिकेचे सामने लखनौ आणि धर्मशाला येथे आयोजित करण्यात आले आहेत. तर मोहाली आणि बंगळुरूकडे कसोटी सामन्यांच्या आयोजनाची जबाबदारी आहे. गुरुवार, 24 फेब्रुवारी रोजी लखनऊमध्ये पहिला सामना खेळवला जाईल. यानंतर शनिवारी 26 फेब्रुवारी आणि रविवार 27 फेब्रुवारीला धर्मशाला येथे दोन्ही सामने खेळवले जातील.
T20 - 24 फेब्रुवारी (गुरुवार) लखनौ
T20 - 26 फेब्रुवारी (शनिवार) धर्मशाळा
T20 - 28 फेब्रुवारी (रविवार) धर्मशाळा
पहिली कसोटी 4 ते 8 मार्च मोहाली
दुसरी कसोटी 12 ते 16 मार्च बंगळुरु