लंडन : इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टमध्येही भारताची निराशाजनक कामगिरी कायम आहे. पहिले १०७ रनवर ऑल आऊट झाल्यानंतर बॉलिंगला आलेल्या भारतीय टीमच्या पदरीही निराशाच पडली आहे. इंग्लंडचा लीड आता २५० रनच्या पुढे पोहोचला आहे. त्यामुळे आता भारताला ही टेस्ट ड्रॉ करण्यासाठी झगडावं लागणार आहे. या मॅचमध्ये भारतानं निवडलेल्या टीमवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. लॉर्ड्सवर ढगाळ वातावरण आणि पाऊस असताना फास्ट बॉलर उमेश यादवला वगळून स्पिनर असलेल्या कुलदीप यादवला खेळवण्याची गरज काय असा सवाल उपस्थित होत आहे.
एकीकडे भारतीय टीमवर टीका होत असताना बीसीसीआयवरही सोशल नेटवर्किंगवर निशाणा साधण्यात येत आहे. बीसीसीआयनं ट्विटरवर टाकलेल्या एका फोटोमुळे वाद निर्माण झाला आहे. तिसऱ्या दिवसाच्या लंचच्या मेन्यूचा फोटो बीसीसीआयनं ट्विटरवर शेअर केला. या मेन्यूमध्ये ब्रेस्ड बीफ पास्ता असल्याचं दिसत आहे. खेळाडूंच्या खाण्यात बीफ असल्यामुळे ट्विटरवरून बीसीसीआयवर टीका करण्यात आली. भारत आणि इंग्लंड या दोन्ही टीमना सारखाच लंच देण्यात आला होता. त्यामुळे बीफ खायचं का नाही हे खेळाडूंवर अवलंबून होतं. बीफ बरोबरच चिकन टिक्का, पनीर टिक्का आणि दाल मखनीसारखे भारतीय पदार्थही होते.
A well earned Lunch for #TeamIndia.
You prefer? #ENGvIND pic.twitter.com/QFqcJyjB5J
— BCCI (@BCCI) August 11, 2018