Ben Stokes reversed ODI retirement : विराट कोहलीचा आवडता खेळाडू बेन स्टोक्स (Ben Stokes) गेल्या काही दिवसांपासून क्रिडाविश्वात चर्चेत आहे. बेन स्टोक्सने नुकतीच निवृत्ती मागे घेतली होती. मात्र, इंग्लंडचा कॅप्टन जॉस बटलर (Jos buttler) यांच्या सांगण्यावरून आपण निवृत्ती मागे घेतल्याचं स्टोक्सने सांगितलं आहे. त्यामुळे आता बेन स्टोक्स इंग्लंडसाठी वर्ल्ड कप जिंकून देणार का? असा सवाल विचारला जात आहे. येत्या 5 ऑक्टोबरपासून भारतात सुरू होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये (World Cup) इंग्लंडने टीम जाहीर केलीये. यात बेन स्टोक्सचा देखील समावेश आहे. गुडघ्याचं ऑपरेशन असताना देखील स्टोक्सने संघासाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतल्याने आता सर्वत्र त्याचं कौतूक होताना पहायला मिळत आहे.
बेन स्टोक्सने शेवटचा एकदिवसीय सामना इंग्लंडविरुद्ध १९ जुलै २०२२ रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध चेस्टर-ले-स्ट्रीट येथे खेळला. यानंतर, त्याने या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली. मात्र, वर्ल्ड कपसाठी इंग्लंड संघाची घोषणा होण्यापूर्वी त्याने पुन्हा एकदिवसीय सामन्यात खेळण्याचा निर्णय घेतला होता. सध्या सुरू असलेल्या इंग्लंड आणि न्युझीलंड यांच्यातील सामन्यात त्याला संधी देण्यात आली आहे. बटलरने जेव्हा स्टोक्सकडे संघात परतण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यावेळी त्याने फक्त फलंदाजी करणार, अशी अट ठेवली होती. त्यानंतर आता स्टोक्स भारतात वर्ल्ड कप तर खेळेल. मात्र, तो गोलंदाजी करताना दिसण्याची शक्यता नाही.
काय होणार आहे, हे मला माहिती आहे. पण ते आत्ता सांगण्याची परिस्थिती नाही. मी सध्या काही स्पेशलिस्ट यांच्याशी बोलणं करतोय. आम्ही एका प्लॅनवर काम करतोय, मला आशा आहे की, आम्ही त्यावर खरे उतरू अन् यशस्वी होऊ. आगामी उन्हाळ्यापर्यंत मी ठणठणीत होऊ शकतो. तशी माझी इच्छा आहे. आता वर्ल्ड कप खेळण्यानंतर मी गुडघ्याच्या ऑपरेशनवर भर देणार आहे, असं बेन स्टोक्स म्हणतो.
England 11 in the first ODI vs NZ:
Brook, Malan, Root, Stokes, Buttler, Livingstone, Woakes, Willey, Rashid, Atkinson, Topley.
- Ben Stokes is back...!!!!! pic.twitter.com/Ir3AdVLQxw
— Johns. (@CricCrazyJohns) September 8, 2023
आणखी वाचा - रोहित शर्माला कसली चिंता सतावतेय? म्हणतो, "मला फक्त 'तो' रेकॉर्ड मोडायलाच"
गुडघ्याचे ऑपरेशन झाल्यास 25 जानेवारीपासून सुरू होणाऱ्या भारताविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी बेन स्टोक्स उपलब्ध होऊ शकणार नाही. गुडघ्याच्या शस्त्रक्रियेतून बरे होण्यासाठी 8 ते 12 आठवडे लागतात. अशा स्थितीत आयपीएलदरम्यानच स्टोक्सला स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन करता येईल. मागील आयपीएलमध्ये खेळताना स्टोक्सने चेन्नईकडून फक्त फलंदाजी केली होती. त्यावेळी देखील जास्त सामने खेळू शकला नव्हता.