मुंबई : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज एकीकडे सामना सुरू होणार आहे. तर दुसरीकडे टीम इंडियाचा महिला संघ न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यामध्ये बदल करण्यात आला आहे. नियोजित वेळापत्रकात बदल करण्यात आल्याने वन डे सीरिज सुरू होण्यासाठी उशीर होऊ शकतो. टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड टी 20 आणि वन डे प्रत्येकी 5 सामने खेळवले जाणार आहेत.
महिला भारतीय संघाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. मात्र हा बदल का करण्यात आला याबाबत अधिकृत कोणतंही कारण समोर आलं नाही. या शेड्युलमध्ये का बदल झाला याची चर्चा मात्र सोशल मीडियावर सुरू झाली आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड नवीन शेड्युल कसं असणार
मिळालेल्या माहितीनुसार 5 पैकी एक टी 20 सामना खेळवला जाणार आहे. तर उर्वरित वन डे 5 सामने खेळवण्यात येणार आहेत.
9 फेब्रुवारी - पहिला टी 20 सामना
12 फेब्रुवारी - पहिला वन डे सामना
15 फेब्रुवारी - दुसरा वन डे सामना
18 फेब्रुवारी - तिसरा वन डे सामना
22 फेब्रुवारी - चौथा वन डे सामना
24 फेब्रुवारी - पाचवा वन डे सामना
ऑस्ट्रेलियामध्ये कडक बायोबबलच्या नियमांमध्ये राहिल्यानंतर आता न्यूझीलंडमधील बयोबबल अधिक चांगलं वाटत असल्याची भावना खेळाडूंची आहे. शनिवारी महिला संघाचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण होईल. त्यानंतर सराव सामने खेळवण्यात येणार आहे. भारत विरुद्ध न्यूझीलंड महिला संघाचे सामने 9 फ्रेब्रुवारीपासून खेळवण्यात येणार आहेत.