Bradley Currie Catch Video Viral in T20 Blast: सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी असलेल्या टी-20 ब्लास्टमधील (T20 Blast) अनेक व्हिडिओ समोर येत आहेत. शुक्रवारी ससेक्स आणि हॅम्पशायर (Sussex vs Hampshire) या दोन संघांत सामना खेळला गेला. या हायप्रोफाईल सामन्यात ससेक्स संघानं हॅम्पशायरचा 6 धावांनी धुव्वा उडवला. हा सामना चर्चेत राहिला तो ब्रॅड क्युरी (Bradley Currie) याने घेतलेल्या कॅचमुळे. डोळ्याचं पारणं फेडणारा हा कॅच पाहून अनेकांना स्वत:च्या डोळ्यावर विश्वासच बसणार नाही.
सध्या सोशल मीडियावर ट्रेंड (Trending) होत असलेला कॅच हा क्रिकेट जगतातील सर्वोत्तम कॅच (Best Catch) असल्याचं अनेक दिग्ग्जांनी म्हटलं आहे. सामना नक्की कसा झाला आणि कॅचविषयी माहिती घेऊया...
ससेक्स आणि हॅम्पशायर या दोन्ही संघांनी तगडी टक्कर दिली. ससेक्सने प्रथम फलंदाजी करताना 184 धावांचं लक्ष्य दिलं होतं. त्यामुळे सामना चांगलाच रंगात आला होता. अखरेच्या दोन ओव्हर बाकी असताना सामना कोणाच्या दिशेने झुकेल? याची उत्सुकता होती. 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हॅम्पशायर संघाला विजयासाठी 12 चेंडूत 27 धावांची गरज होती. सेक्सकडून 19 वी ओव्हर टायमल मिल्स (Tymal Mills) याच्याकडे सोपवण्यात आली. त्यावेळी धावा रोखणं हेच मेन उदिष्ट होतं.
टायमल मिल्सच्या 19 व्या ओव्हरच्या दुसऱ्या बॉलवर बेनी हॉवेलने (Benny Howell) मिडविकेटच्या दिशेने टोला लगावला. बॉल आरामात बॉन्ड्री क्रॉस करणार, अशी शक्यता होती. मात्र, खरा गेम इथं झाला. ब्रॅडली क्युरीने बॉलच्या दिशेने धावत जाऊन बॉन्ड्रीजवळ 4 फूट हवेत झेप घेतली आणि एका हातात कॅच पकडला. क्युरी आडवा तिडवा होऊन खाली पडला पण पठ्ठ्यानं कॅच काही सोडला नाही. त्यावेळी त्याने अनोख्या अंदाजात सेलिब्रेशन (Bradley Currie Catch Video) केलं.
STOP WHAT YOU ARE DOING
BRAD CURRIE HAS JUST TAKEN THE BEST CATCH OF ALL TIME #Blast23 pic.twitter.com/9tQTYmWxWI
— Vitality Blast (@VitalityBlast) June 16, 2023
दरम्यान, ससेक्सकडून ऑलिव्हर कार्टर याने 33 चेंडूत 64 धावांची खेळी केली. मात्र, ब्रॅडली क्युरीचा कॅच हा सर्वोत्तम कॅच ठरला. हा कॅच घेण्यासाठी त्याने केलेली धावा अप्रतिम होती, असं दिनेश कार्तिक याने म्हटलं आहे. हॅम्पशायरची टीम 9 विकेट्स गमावत 177 धावा करू शकली. त्यामुळे ससेक्स संघानं हॅम्पशायरचा 6 धावांनी पराभव केला आहे.