Mankhurd Nawab Malik vs Abu Azmi: मानखुर्दमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आणि समाजवादी पक्षाचे अबू आझमी यांच्यात थेट लढत आहे. भाजपाने विरोध केल्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना तिकीट देण्यात आलं आहे. याचमुळे भाजपाने नवाब मलिकांसाठी प्रचारही केली नाही. दरम्यान दरम्यान दुसऱ्या फेरीनंतर नवाब मलिक पिछाडीवर आहे. नवाब मलिक यांना फक्त 987 मतं मिळाली आहे.
अबू आझमी तिसऱ्या फेरीअखेर 1030 मतांनी आघाडीवर
अबू आझमी यांची MIM चे अतिक खान यांच्याशी लढत
अतीक खान दुसऱ्या क्रमकावर
अबू आझमी 7643
अतिक अहमद खान (MIM) 6765
नवाब मलिक 987
मोहम्मद सिराज (वंचित) 552
बुलेट पाटील (शिवसेना शिंदे) 911
दुसऱ्या फेरीनंतर अबू आझमींची आघाडी कायम आहेत.
नवाब मलिक यांना तिकीट देण्यास भाजपाने स्पष्टपणे विरोध केला होता. आशिष शेलार यांनी आम्ही नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही असं जाहीर केलं होतं. मात्र त्यानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून त्यांना तिकीट देण्यात आलं होतं. पक्षाने नाव जाहीर केलेलं नसतानाही नवाब मलिक यांनी अर्ज दाखल करत अपक्ष लढण्याची तयारी केली होती. मात्र अखेरच्या क्षणी राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक यांना एबी फॉर्म देण्यात आला होता.
"कोणाचा विरोध, कोणाचं समर्थन हा विषय नाही. लोकांच्या आग्रहामुळे मी येथे निवडणूक लढत आहे. आधी मी निवडणूक लढायचं नाही असं ठरवलं होतं. पण या मतदारसंघाची परिस्थिती चिंताजनक आहे. झुंडशाही, गुंडशाही, ड्रग्जचा कारभार, लहान मुलं ड्रग्ज घेत आहेत. तुम्ही लढल्याशिवाय येथील परिस्थिती बदलणार नाही असा त्यांचा आग्रह आहे. त्यांच्या आग्रहामुळे मी निवडणूक लढणार आहे. जर पक्षाची उमेदवारी नक्की झाली तर पक्षाच्या वतीने, अन्यथा अपक्ष लढणार," असं नवाब मलिक यांनी जाहीर केलं होतं.
अजित पवार संकटाच्या वेळी माझ्या पाठीशी उभे राहिले. माझं कर्तव्य आहे की मी त्यांच्यासोबत उभं राहावं. पण काहीही परिस्थिती असली तरी मी लढणार आणि जिंकणार. रेकॉर्डब्रेक मतांनी मी जिंकेन. माझी मुलगी राष्ट्वादीकडून अणुशक्तीनगरमध्ये लढत आहे. मी येथे लढत आहे. कोण समोर आहे याची चिंता नाही. दोन्ही ठिकाणी बहुमताने निवडून येऊ, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला होता.
2019 च्या निवडणुकीत मानखुर्द मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी विजयी झाले होते. त्यांना 69082 मतं मिळाली होती. त्यांनी 25601 मतांच्या फरकाने निवडणूक जिंकली. आझमी यांना 48.18 टक्के मतं मिळाली होती.