Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड

Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar:  शिवसेनेत फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेच्या बाळा नांदगावकार यांना पाठींबा दिला आहे. 

Pravin Dabholkar | Updated: Nov 23, 2024, 03:32 PM IST
Shivdi VidhanSabha LIVE Updates: अजय चौधरींच्या विजयाची हॅट्रीक, 7140 मतांनी राखला गड title=
शिवडी मतदारसंघ

Ajay Choudhary Vs Bala Nandgaonkar: महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा रंगतदार सामना होतोय. शिवसेना आणि राष्ट्रवादीतील फुटीनंतरची ही पहिलीच विधानसभा निवडणूक आहे. त्यामुळे याचा कोणाला फायदा होणार? कोणाला नुकसान होणार? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. शिवडी मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. येथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे अजय चौधरी आमदार आहेत. दरम्यान आता शिवसेनेत फूट झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने मनसेच्या बाळा नांदगावकार यांना पाठींबा दिला आहे. त्यामुळे इथली लढत फार रंगतदार होणार आहे.

19 व्या फेरीअखरे अजय चौधरी यांना 74 हजार 890 मते मिळाली. बाळा नांदगावकर यांना 67 हजार 750 मतं मिळाली. अपक्ष उमेदवार नाना आंबोले यांना 5925 मतं मिळाली. बाळा नांदगावकर यांचा 7 हजार 140 हजार मतांनी पराजय झाला. 

17 व्या फेरीअखेर अजय चौधरी 8330 मतांनी आघाडीवर आहेत.

नवव्या फेरीअखेर अजय चौधरी 9672 मतांनी आघाडीवर आहेत.

पाचव्या फेरीनंतर अजय चौधरी हे 7519 मतांनी आघाडीवर आहेत.

चौथ्या फेरीनंतर शिवडी विधानसभेतून अजय चौधरी 6250 मतांनी आघाडीवर.

दुसऱ्या फेरी अखेर अजय चौधरी यांना 7570 तर बाळा नांदगावकर यांना 6301 मते आहेत. नाना आंबोले यांना 917 मतं आहेत.

8.30 वाजता निकालाचा पहिला कल हाती आला तेव्हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे अजय चौधरी आघाडीवर आहेत. 

कशी होईल लढत?

शिवडी मतदारसंघात अजय चौधरी यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या बाळा नांदगावकर यांच्याकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता आहे. बाळा नांदगावकर यांच्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवडीत सभा घेतली होती. भाजपने या मतदारसंघात बाळा नांदगावकर यांना पाठींबा दिला आहे. अपक्ष उमेदवार नाना आंबोलेदेखील या मतदारसंघातून आपले नशिब आजमावत आहेत. नाना आंबोलेदेखील माजी शिवसैनिक आहेत. पण अंतर्गत वादामुळे त्यांनी भाजपची वाट धरली होती. पण विधानसभा निवडणुकीत ते अपक्ष उमेदवार म्हणून लढत देत आहेत. 

अजय चौधरींच्या उमेदवारीवरुन झाला होता वाद 

अजय चौधरी यांना उमेदवारी दिल्यानंतर शिवडी मतदारसंघातील कार्यकर्त्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. लालबागचा राजा मंडळाचे मानद् सचिव सुधीर साळवी यांना आमदारकीच तिकीट द्यावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. पण उद्धव ठाकरेंनी अजय चौधरींना उमेदवारी दिली. दरम्यान सारं काही विसरुन सुधीर साळवींनी अजय चौधरींच्या प्रचारसभेत हिरिरीने भाग घेतला. सुरुवातीला नाराज असलेले कार्यकर्ते निवडणूक प्रक्रियेत मशाल चिन्हासाठी मैदानात उतरलेले दिसले.