WTC Final मध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन विराट भावूक, टीम इंडियाबद्दल काय म्हणाला?

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील राखीव दिवशी टीम इंडियाचा पराभव झाला.

Updated: Jun 24, 2021, 10:52 PM IST
WTC Final मध्ये पराभूत झाल्यानंतर कॅप्टन विराट भावूक, टीम इंडियाबद्दल काय म्हणाला? title=

साऊथम्पटन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम सामन्यातील (Wtc Final 2021) राखीव दिवशी टीम इंडियाचा (Team India) पराभव झाला. टीम इंडियाने विजयासाठी दिलेलं आव्हान न्यूझीलंडने (New Zealand) 2 विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं. शांत स्वभावाचा केन विल्यमन्सन टेस्ट क्रिकेटचा किंग ठरला. न्यूझीलंडला 2015 आणि 2019 च्या आयसीसीच्या अंतिम सामन्यात पराभव स्वीकारावा लागला होता. न्यूझीलंडला जेतेपदाने हुलकावणी दिली. पण यावेळेस न्यूझीलंडने ही संधी सोडली नाही. एका बाजूला विजयाचा जल्लोष केला जात होता. तर दुसऱ्या बाजूला पराभव झाल्याने टीम इंडियाच्या गोटात निराशेचं वातावरण होतं. (captain virat kohli tweet Team India group photo after lost wtc final 2021)

पराभवामुळे भारतीय क्रिकेट चाहतेही निराश झाले होते. दरम्यान या पराभवाच्या 24 तासांनंतर आज म्हणजेच 24 जूनला कर्णधार विराट कोहलीने एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोतून दिलेल्या मेसेजमधून विराट भावूक असल्याचं दिसून येतंय. विराटने टीम इंडियाच्या खेळाडूंचा सर्कलचा फोटो शेअर केला आहे.

विराटने काय म्हटलंय? 

ट्विट केलेल्या फोटोवर विराटने लिहिलंय की, "ही केवळ टीम नाही तर एक कुटुंब आहे. आम्ही एकत्र पुढे वाटचाल करु, असा आशावाद  विराटने व्यक्त केला. दरम्यान आता टीम इंडियाची बी टीम शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. तर इथे इंग्लंडमध्ये विराटसेना इंग्लंड विरुद्ध कसोटी मालिका खेळणार आहे.  

संबंधित बातम्या :

WTC: टीम इंडियाच्या पराभवावर सचिन तेंडुलकर याचे मोठे विधान, पाहा कोण जबाबदार?

WTC 2021: विराट कोहली नको आता आम्हाला हवाय 'हा' मुंबईकर कॅप्टन