लंडन : पाकिस्तानी क्रिकेटर्स आणि फनी इंग्रजी यांचे अतूट बंध आहे. पाकिस्तानी क्रिकेटरच्या इंग्रजीवरून यापूर्वीही अनेक वेळा खिल्ली उडवली गेली आहे.
सोशल मीडियावर म्हटले गेले की पाकिस्तानी क्रिकेटर परदेशात क्रिकेट खेळण्यासाठी खेळाची नाही तर इंग्रजीची प्रॅक्टीस करतात.
तसेच सोशल मीडियावर असेही म्हटले गेले की, पाकिस्तानचा संघ परदेशात स्वतःहून पराभूत होतो. कारण मॅच जिंकल्यावर मुलाखत न द्यावी लागो. या वेळी इंग्लडमध्ये होत असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये पाकिस्तानी खेळाडूंच्या खराब इंग्रजीची खिल्ली उडवली जात आहे.
पाकिस्तानाकडून पराभव झाल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला धोबी पछाड देणाऱ्या पाकिस्तान संघातील कप्तान सरफराज अहमदने प्रेस कॉन्फरन्स केली. यावेळी इंग्रजी पत्रकारांच्या प्रश्नांना मेजदार उत्तर दिली.
The secret to @TheRealPCB's stunning form reversal? Apparently nothing! #CT17 pic.twitter.com/JYOyZZAxvU
— Cricket Network (@CricketNetwork) June 8, 2017
मॅच संपल्यानंतर हसन अलीला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी हसन अली बाबत असं काही झाले की तुम्हांलाही हसू येई.
सायमन डूल याने हसन अलीला प्रश्न विचारला, त्याला इंग्रजीत उत्तर देता येणार नाही म्हणून त्याने आपल्या साथीदाराला बोलावले. यावेळी भाषांतर करून साथीदाराने साथ दिली. पण एका प्रश्नावर त्याने उत्तर न देता साथीदाराला म्हटले बोल दे...