चेतेश्वर पुजाराची एक चूक टीम इंडियाला पडली महागात!

फिल्डींग दरम्यान चेतेश्वर पुजाराची एक चूक टीमला खूप महागात पडली आहे. 

Updated: Jan 13, 2022, 09:17 AM IST
चेतेश्वर पुजाराची एक चूक टीम इंडियाला पडली महागात! title=

केपटाऊन : टीम इंडिया सध्या दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात तिसरी आणि निर्णायक कसोटी केपटाऊनमध्ये खेळली जातेय. दुसऱ्याच दिवशी टीम इंडियाने आफ्रिकन टीमवर पकड घट्ट केलीये. मात्र फिल्डींग दरम्यान चेतेश्वर पुजाराची एक चूक टीमला खूप महागात पडली आहे. याचा व्हिडीयो सोशल मीडियावर व्हायरल होत असून पुजाराला मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जातंय.

टीम इंडिया फिल्डींग करत असताना असं काही घडलं की पेनल्टी म्हणून 5 धावा गमावल्या लागल्या. इतकंच नाही तर ज्यावेळी कॅच सोडला गेला तेव्हा हा कॅच चेतेश्वर पुजाराकडून सुटला. 

झालं असं की, टीम इंडिया गोलंदाजी करत असताना 50वी ओव्हर सुरु होती. त्यावेळी शार्दुल ठाकूर गोलंदाजी करत असताना टेम्बा बावुमाच्या बॅटला लागून एक बॉल स्लिपमध्ये गेला. मात्र तिथे उभा असलेला चेतेश्वर पुजाराने हा कॅच सोडला. 

मात्र सर्वात वाईट गोष्ट कॅच सोडल्यानंतर घडली. पुजाराने कॅच सोडल्यानंतर तो बॉल थेट विकेटकीपर ऋषभ पंतच्या मागे ठेवलेल्या हेल्मेटला जाऊन लागला. यामुळे पेनेल्टी म्हणून टीम इंडियाला 5 रन्सचा भुर्दंड पडला.

चेतेश्वर पुजाराच्या हातातून सुटलेला बॉल हेल्मेटजवळ जात असता विराट कोहलीने तो रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. अशा स्थितीत टीम इंडियाला 5 रन्सचं नुकसान सहन करावे लागलं.