युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट

Yuvraj Singh-Hazel Keech New Flat in Mumbai : भारताचा स्टार माजी ऑलराऊंर युजराज सिंह आणि पत्नी हेजल किचने मुंबईत आपला अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. हा फ्लॅट विराट कोहली आणि अनुष्काच्या शेजारीच असून याची किंमत कोट्यवधीत आहे.   

राजीव कासले | Updated: Oct 5, 2024, 08:54 PM IST
युजराज-हेजल बनले विराट-अनुष्काचे नवे शेजारी, मुंबईत घेतला 'इतक्या' कोटींचा अलिशान फ्लॅट title=

Yuvraj Singh-Hazel Keech New Flat: टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंह (Yuvraj Singh) आणि त्याची पत्नी हेजल किच (Hazel Keech) आता विराट कोहली आणि अनुष्का शर्माचे नवे शेजारी बनले आहेत. युवराज आणि हेजलने मुंबईत अलिशान फ्लॅट विकत घेतला आहे. युवराज सिंगच्या या नव्या फ्लॅटची किंमत तब्बल 64  कोटी रुपये आहे. या फ्लॅटमध्ये लक्झरी सुविधा असून 16 हजार स्केअर फूटमध्ये पसरला आहे. युवराज आणि हेजला फ्लॅट 29 व्या मजल्यावर आहे. तर कोहली आणि अनुष्काचा फ्लॅट 35 व्या मजल्यावर आहे. 

युवराज आणि हेजलने नव्या प्लॅटचा लिव्हिंग रुम महागड्या पेंटिंगने सजवला आहे. युवी आणि हेजलच्या आवडीनुसार घराची सजावट करण्यात आली आहे. यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले आहेत. युवराज सिंगच्या घराच्या बाल्कनीतून मुंबई शहराचा शानदार नजारा पाहायला मिळतो. या इमारतीत गेमिंग झोन, स्विमिंग पूल अशा लक्झरी सुविधा देण्यात आल्या आहेत. 

बेडरुममध्ये मार्बलची सजावट
युवराज आणि हेजलच्या नव्या फ्लॅटचा बेडरुमवरही विशेष लक्ष देण्यात आलं आहे. बेडरुममध्ये चमकदार मार्बलचा वापर करण्यात आला आहे. भिंतींना ऑफ व्हाईट रंगाना रंगवण्यात आलं आहे. विराटच्या घरापेक्षा युवराज सिंगच्या फ्लॅटची किंतम दुप्पट आहे. विराट कोहलीच्या प्लॅटची किंमत 34 कोटी रुपये आहे. 

आणखी कुठे आहेत युवराजची घरं
युवराज सिंगची केवळ मुंबईतच नाही तर आणखी काही ठिकाणी अलिशान घरं आहेत. गुरुग्राममध्ये युवराज सिंगची प्रॉपर्टी आहे. इथल्या डीएलएफ सिटीत युवराज सिंगचं घर असून विशेष म्हणजे या ठिकाणी देखील विराट कोहली युवराज सिंगचा शेजारी आहे. टीम इंडियाच्या या ऑलराऊंडर खेळाडूचं छतरपूरमध्येही पाच बीएचकेचं पेंटहाऊस आहे. याशिवाय पंचकुलामध्ये युवराजचा बंगला आहे.